

नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याणकरांचा प्रवास सुकर होणार
ऐरोली-कटाई नाका कॉरिडोर प्रकल्प दुसरा टप्पा पूर्ण
नव्या प्रकल्पामुळे होणार वेळेची बचत
नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. ऐरोली-कटाई नाका कॉरिडोर प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण झालाय. या प्रकल्पातील ऐरोली ते ठाणे-बेलापूरपर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण झालं. या प्रकल्पातील बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग ४ या मार्गाचं ९२ टक्के पूर्ण झालंय.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रकल्पात दोन स्वतंत्र्य बोगद्यांचाही समावेश आहे. दोन्ही बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झालंय. परंतु उर्वरित काम कधी पूर्ण होणार, याबाबत माहिती समोर आलेली नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऐरोली कटाई नाका या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात हाती घेण्यात आलंय. या प्रकल्पाची लांबी १२.३ किमी एवढी आहे. या मार्गामुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईतील ७ किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. नव्या प्रकल्पामुळे १५ मिनिटांची बचत होणार आहे.
पहिल्या दोन टप्प्याचे काम डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होते. परंतु अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहनधारकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. वाहतूक टप्पा १ आणि टप्पा २ पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. वाहतूकसाठी प्रमुख विकास केंद्रादरम्यान वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुलुंड ते कटाई नाकादरम्यान ७-८ किलोमीटरची बचत होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ३०-४५ मिनिटांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे ठाणे-बेलापूर रोड, महापे रोड, शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा, कल्याण-शिळ रोड येथील वाहतूककोंडी कमी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.