मुंबईत मेट्रोच्या विविध प्रकल्पांच्या कामांना गती
मुंबई आणि नवी मुंबई शहर जोडणीचे काम जलदगतीने सुरू
मेट्रो ८ प्रकल्प गेमचेंजर ठरणार, लाखो प्रवाशांना होणार फायदा
मुंबईतील विविध प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढला आहे. आता मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना मेट्रो मार्गाने जोडण्याचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या'गोल्डन लाइन' म्हणजे मेट्रो लाइन ८ मार्गाच्या कामाचाही वेग वाढला आहे.
मेट्रो ८ मुंबईतील गेमचेंजर प्रकल्प मानला जातोय. ३४ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग दोन विमानतळांना जोडण्यासाठी तयार केला जात आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी २२, ८६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मेट्रो मार्गावर किती स्टेशन असणार?
मेट्रो मार्गावर एकूण २० स्टेशन असणार आहेत. यात १४ स्टेशन एलिवेटेड आणि ६ स्टेशन अंडरग्राऊंड (भूमिगत) असणार आहेत. या मार्गाचा ९.२५ किलोमीटर भाग भूमिगत असणार आहे. तर 24.63 किलोमीटर भाग एलिवेटेड असणार आहे.
प्रवाशांना काय फायदा होणार?
मुंबई विमानतळावरून नवी मुंबईला जाण्यासाठी रस्तेमार्गे प्रवासात साधारण एक तास लागतो. गोल्डन लाइन सुरू झाल्यावर तासांचा प्रवास मिनिटावर येईल. मेट्रोमुळे आंतरराष्ट्रीय आणि घरगुती प्रवाशांना एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाणे सोपे होईल.
वाहतूक कोंडीतून सुटका
नव्या मेट्रो मार्गामुळे सायन-पनवेल हायवे आणि वाशीच्या खाडीवरील ब्रीजवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. या मार्गाजवळील मानखुर्द, वाशी, बेलापूर सारख्या शहरातील घरांच्या किंमती वाढतील.
तत्पूर्वी, मेट्रो ८ प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप मॉडलवर विकसित केला जात आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारची २०-२० टक्के भागीदारी आहे. तर उर्वरित ६० टक्के गुंतवणुकीची तरतूद खासगी ऑपरेटरद्वारे केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला विशेष महत्व दिलं आहे. तर मेटो ८ मार्ग ३ वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.