Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: साडी नेसून स्टंटबाजी; होळीचा रिल शूट करताना तरुणीसोबत भलतचं घडलं, VIDEO व्हायरल

Viral Video: अनेक रिलस्टार होळीच्या सणाचा उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळे हटके कंटेट तयार करत आहेत. मात्र अनेकदा हे भलते धाडस धोकादायकही ठरु शकते. असाच धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सध्याच्या तरुणाईला सोशल मीडियाचे लागलेले वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवण्याचा छंदच अनेकांना लागला आहे. त्यासाठी हे सोशल मीडिया क्रिएटर अनेक धोकादायक स्टंटही करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये होळीचा रिल शूट करताना तरुणीने केलेले भलते धाडस तिच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्याआधीच सोशल मीडियावर रंगपंचमीचे व्हिडिओ अन् असंख्य रिल्स पाहायला मिळत आहेत. अनेक रिलस्टार होळीच्या सणाचा उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळे हटके कंटेट तयार करत आहेत. मात्र अनेकदा हे भलते धाडस धोकादायकही ठरु शकते. असाच धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी साडी घालून पोल फ्रेमवर लटकून होळी स्पेशल रिल शूट करत आहे. त्यासाठी तिने कलर पॉप अपही चिकटवल्याचे दिसत आहे. मात्र या कलर पॉपमुळेच तरुणीच्या साडीने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडतो. कशीबशी ही तरुणी ती आग विझवते. त्यामुळे रिल्स शूट करताना केलेला हा प्रकार तिच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,तरुणी नारंगी रंगाची साडी, स्पोर्ट्स शूज घालून व्हिडिओ शूट करत आहे. त्यासाठी तिने बुटांना सेलोटेपने कलर पॉप अप चिकटवल्याचेही दिसत आहे. कलर पॉप अपला आग लावल्यानंतर त्यातून रंगीत धूर बाहेर पडतो. ज्यामुळे तरुणीचा रिल खूपच सुंदर दिसत आहे.

मात्र शेवटी या कलर पॉपअपला लागलेली आग विझण्याऐवजी तरुणीच्या साडीच्या संपर्कात येते अन् पेट घेते. अचानक आग लागल्यामुळे तरुणीही घाबरुन जाते. ती उड्या मारुन आग विझवण्याचा प्रयत्न करते. अखेर सोबत असलेल्या काही तरुणांच्या मदतीने ती आग विझते. दरम्यान, यामध्ये तरुणीला कोणतीही जखम झाली नाही, मात्र अशाप्रकारे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला तिला नेटकऱ्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला भगदाड! बड्या नेत्याचा इंजिनला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का|VIDEO

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांचा पुन्हा एकदा सतेज पाटील यांना इशारा

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT