Maratha Reservation : मराठा तरूण आक्रमक; प्रणिती शिंदेंसमोरच 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा, रोषामुळं गावातून माघारी फिरल्या

Madha Lok Sabha Constituency Election: मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात येण्यास नेत्यांना‌ बंदी आहे. त्यामुळे तुम्ही गावात थांबू नका असे स्थानिक मराठा समाजातील युवकांनी आमदार प्रणिती शिंदेंनी म्हटले.
Praniti Shinde criticizes Shinde-Fadnavis
Praniti Shinde criticizes Shinde-Fadnavis saam tv
Published On

Pandharpur News:

भाजपला गाव बंदी नाहीतर घर बंदी करा असे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (mla praniti shinde) यांनी मराठा समाजाला केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात (pandharpur vidhansabha) गाव भेटी दौरा सुरू केला आहे. काही गावात मराठा आरक्षण (maratha reservation) मुद्द्यावरून त्यांना गावा येण्यास विरोध हाेऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार शिंदेंनी ज्यांनी तुम्हांला फसविले त्यांना गाव नव्हे तर घर बंदी करा पवित्रा घेत मराठा समाजाला आवाहन केले. (Maharashtra News

आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान आज (बुधवार) पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावात मराठा युवकांनी आरक्षणाच्या मागणीवरून आमदार शिंदे यांच्यासमाेर गोंधळ घातला. कौठाळी गावामध्ये आमदार शिंदे या गेले असता तेथील मराठा समाजातील युवकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास प्रारंभ केला. मराठा समाजाच्या युवकांचा रोष पाहता आमदार प्रणिती शिंदे यांनी गावातून बाहेर पडणे पसंत केले.

Praniti Shinde criticizes Shinde-Fadnavis
Dharashiv Crime News : 3200 रुपयांची लाच घेताना जात पडताळणी कार्यालयातील दोघांना अटक, धाराशिव एसीबीची कारवाई

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या खरतर विरोध भाजपचा झाला पाहिजे. त्यांनी एक दिवसाचे अधिवेशन घेऊन खेळी केली आहे. उघडं पाडण्याची वेळ आली आहे. भाजप पुन्हा खोटे नाटे सांगून लोकांची दिशाभूल करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गाव बंदी केली पाहिजे, घरबंदी केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Praniti Shinde criticizes Shinde-Fadnavis
BJP Candidate : सातारा लाेकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रसेचा; उदयनराजे, शिवेंद्रराजे भूमिकेवर ठाम, आज निर्णयाक बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com