Viral Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: थरारक! रिल्ससाठी जिवाशी खेळ; तरुणी उंच झाडावर चढली अन्... धक्कादायक VIDEO

Viral Video: या व्हिडिओमधील तरुणी चक्क उंच झाडाच्या फांदीवर बसून रामनामाचा जप करताना दिसत आहे. तिच्या या धक्कादायक कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सध्याच्या तरुणाईला रिल्स अन् सोशल मीडियाचे लागलेले वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठीही तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. माध्यमांवर अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा असे जीवघेणे स्टंट करणे महागातही पडू शकते. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या झटपट प्रसिद्धी अन् श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर रिल्स बनवून असंख्य तरुण- तरुणी आपले नशिब आजमावत असतात. त्यासाठी सर्वात हटके, आगळा वेगळा कंटेट तयार करण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात. माध्यमांवर फेमस होण्यासाठी, लाईक अन् फॉलोअर्स मिळवण्यासाठी हे रिल्सस्टार कोणत्याही थराला जात असतात.

अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका तरुणीच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमधील तरुणी चक्क उंच झाडाच्या फांदीवर बसून रामनामाचा जप करताना दिसत आहे. तिच्या या धक्कादायक कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral VIdeo) तुम्ही पाहू शकता की, तरुणी अत्यंत धोकादायक अशा उंच झाडावर चढल्याचे दिसत आहे. ती ज्या फांदीवर बसली आहे, ती फांदीही नाजूक आहे. जरा तोल गेला, फांदी तुटली तर मोठा अनर्थ घडू शकतो. अशा ठिकाणी ही तरुणी प्रभू श्रीरामाचे भजन करताना दिसत आहे. आत्तापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी देवापासून २ पाऊले दूर आहेस, अशी खोचक कमेंटही केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT