Dance Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Dance Viral Video : रणरागिणींनी गणरायाच्या आरतीवर धरला ठेका; एनर्जेटीक डान्स Video व्हायरल

Ruchika Jadhav

राज्यात सर्वत्र लाडक्या बाप्पासह गौराईचं सुद्धा आगमन झालं आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलंय. लाडक्या गणरायाच्या आगमनासह विसर्जनाला सर्वजण धमाल करतात. ढोल, ताशा आणि डिजेच्या तालावर ठेका धरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक ग्रुप डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही तरुणींनी थेट गणपती बाप्पाासाठी घेतल्या जाणाऱ्या आरतीवर डान्स केला आहे.आरती सुरू असताना या तरुणींनी एकत्र येत फुल ऑन एनर्जीमध्ये नृत्य सादर केलं आहे. गणपतीचा जयजयकार म्हणत "घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे" या आरतीवर तरुणींच्या या ग्रूपने सुंदर डान्स केला आहे.

जबरदस्त डान्स स्टेप्स आणि दणक्यात डान्स करत या तरुणींनी आपला परफॉर्मन्स सादर केला आहे. @ lavanipremi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आणखी आहेत का शब्द यासाठी तुमच्याकडे, असं कॅप्शन सुद्धा यावर देण्यात आलं आहे.

व्हिडिओ पाहून समजत आहे की, एका डान्स क्लासमधील ग्रुपने हा डान्स बसवला आहे. डान्स स्टेप्स बसवून यांनी या गाण्यावर अगदी जोरदार डान्स केला आहे. सर्वांनी येथे सुंदर ट्रेडिश्नल आउटफीट सुद्धा वेअर केलंय. नेटकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ भन्नाट आवडला आहे.

नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये, "खूप सुंदर अप्रतिम, अंगावर काटा आला बघताना. आणि काय एनर्जी लावलीये मस्तच. गाण्याच्या बीटबरोबर फास्ट मुव्हमेंट केल्यात सर्वांनीच." एकदम तालबद्ध एक बीट सुध्दा मिस न होता याला म्हणतात डान्स,असज् जर तुमचं महिला मंडळचं रुद्र अवतार जर राहील तर कोणाचीच हिंमत नाही राहणार तुम्हाला हात लावायची, अशा भरपूर कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत.

गणपती बाप्पा म्हटलं की सर्वांना नाचत आणि जल्लोषात हा उत्सव साजरा करायचा असतो. बाप्पा घरी येतो तेव्हाचा उत्साहच वेगळा असतो. हाच उत्साह या तरुणींनी आपल्या डान्समधून दाखवलाय. विशेष म्हणजे त्यांनी "घालीन लोटांगण वंदीन चरण", वर डान्स केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT