Garba In Mumbai Local Train Saam Tv
व्हायरल न्यूज

Garba In Mumbai Local Train: महिलांचा स्वॅगच भारी, धावत्या ट्रेनमध्ये खेळला गरबा, Video व्हायरल

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी नवरात्रीच्या निमित्ताने गरबा खेळला. धावत्या ट्रेनमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी महिलांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे.

Manasvi Choudhary

रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून संबोधिली जाते. दिवसाचा अर्धा वेळ व्यक्ती ट्रेनमध्ये प्रवासांमध्ये घालवते. कामानिमित्त सकाळ संध्याकाळ ट्रेनमधून प्रवासी प्रवास करतात यामध्ये महिलांचा देखील समावेश असतो. ट्रेनमधील महिलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये महिला कधी भाजी निवडतात तर कधी पुस्तके वाचतात. महिला अंभग- किर्तन देखील ट्रेनमध्ये करतात. नुकताच महिलांनी ट्रेनमध्ये गरबा खेळला आहे. या महिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवरात्री सणांचा सर्वत्र उत्साह सुरू आहे. नवरात्रीनिमित्त महिलांनी ट्रेनमध्ये गरबा खेळत आनंद साजरा केला आहे. अनेक ठिकाणी गरबानिमित्त खास कार्यक्रम राबवले आहेत यामुळे येथे गर्दी असते. मात्र नोकरीला जाणाऱ्या महिलांना गरबा खेळण्यासाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ट्रेनमध्ये महिला या पारंपारिक लूकमध्ये नवरात्रीचे रंग फॉलो करत गरबा खेळतात.

या महिलांनी ट्रेनमध्ये प्रवास करताना गरबा खेळला आहे. कामाच्या व्यापातून थोडा वेळ महिलांनी एकत्र येऊन गरबा खेळला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला आनंदात गरबा खेळत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali News: शिक्षक बनला भक्षक; शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थीनीला गाठायचा अन् नको ते कृत्य करायचा

Maharashtra Live News Update: राज्यातील देवस्थानांनी पूरग्रस्तांना मदत करावी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची मागणी

Anganwadi Teacher: अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी! सेवासमाप्तीची वयोमर्यादा वाढली

Face Care: तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस वॉश चांगला नाही, एकदा जाणून घ्या

Nashik Shocking : मैत्रिणीसह फोटोग्राफर तरुणीला हॉटेलमध्ये डांबलं; शरीरसुखाची मागणी केली, पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

SCROLL FOR NEXT