
सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामुळे खरंच धक्काच बसतो. अनेकदा काही घटनांवर विश्वास देखील बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसांच्या व्हॅनवर एक कपल अश्लील चाळे करत आहे जे पाहून तुमचंही डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही.
पोलिस म्हटलं की आपण सर्वजण घाबरतो. लहानपणापासून आपल्याला पोलिसांचा धाक दाखवला जातो. मात्र याच पोलिसांच्या व्हॅनवर एक जोडपं अश्लील चाळे करताना दिसत आहे. १० मिनिटांचा हा या गर्लफ्रेंड अन् बॉयफ्रेंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधताना दिसत आहे.
गुजरातच्या रामपुरा पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांचा ग्रस्त घालत होते. सरोवर टॉकीजजवळ उभे असलेले ते तरूण - तरूणी पोलिसांना पाहून पळून गेले. दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडले पण व्हॅनमध्ये जाण्याऐवजी हे जोडपं पोलिसांच्या व्हॅनच्या छतावर चढले आणि अश्लील चाळे करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरूणाने दारूच्या नशेत १७ वर्षीय मुलीला तिच्या घरातून पळवून आणले होते. मुलींच्या कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.