Wild gaur spotted near Mopa International Airport saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मोपा विमानतळावर रानगव्याची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह प्रवासी घाबरून पळू लागले; VIDEO व्हायरल

Wild gaur spotted near Mopa International Airport: गोवा-सिंधुदुर्ग सीमेवरील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात भल्या मोठ्या रानगव्याने अचानक प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे विमानतळ सुरक्षा आणि वन्यजीव वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आतापर्यंत विमानतळावर तुम्ही कधी कुत्रा किंवा मांजर पाहिलंय का? आता तुम्ही म्हणाल की नाही. कारण विमानतळावर सुरक्षाच इतकी जास्त असते. पण आम्ही आता तुम्हाला जो व्हिडीओ दाखवणार आहोत तो तुम्ही कधीच पाहिला नसेल. या व्हिडीओमध्ये एका विमानतळाजवळच्या परिसरात चक्क रानगवा आल्याचं पाहायला मिळालंय.

सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एका भल्या मोठ्या रानगव्याने अचानक प्रवेश केल्याची घटना समोर आलीये. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालाय. विमानतळासारख्या जास्त सुरक्षा असलेल्या ठिकाणी जंगली प्राण्याचा वावर आढळल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हायरल व्हिडिओत काय दिसतंय?

व्हायरल व्हिडिओमध्ये मोठा रानगवा विमानतळाच्या रस्त्यालगत फिरताना दिसतोय. परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं. सुरक्षा कर्मचारी आणि विमानतळ प्रशासनाने तत्काळ पावलं उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली. कर्मचाऱ्यांनी रानगव्याला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हाकलून दिलं.

कर्मचारी आणि प्रवाशांची धावपळ

घटनेदरम्यान विमानतळ परिसरातील कर्मचारी व काही प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळातील काही भागातील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा हल्ल्याची घटना घडली नाही. मात्र, विमानतळाच्या परिसरात अशा प्रकारे जंगली प्राण्याचा प्रवेश होणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटंल जातंय.

गेल्या काही दिवसांपासून गव्यांचे कळप शेती आणि बागायतीमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. मात्र, आज चक्क विमानतळाच्या परिसरात गव्याने शिरकाव केल्याने तेथील कर्मचारी आणि प्रवाशांची धावपळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT