Moment when an angry elephant in Bandipur Tiger Reserve charged and trampled a tourist taking photos saamtv
व्हायरल न्यूज

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

Elephant Tramples Tourist: कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात एका पर्यटकावर एका हत्तीने हल्ला केलाय. ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकावर हत्तीचा हल्ला.

  • फोटो काढण्याच्या प्रयत्नावर हत्ती संतापला.

  • हत्तीने पर्यटकाला पायाखाली तुडवले पण तो वाचला.

  • घटना उटी–म्हैसूर महामार्गावर घडली आणि व्हिडिओ व्हायरल झाला.

कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात एका पर्यटकावर गजराज चांगलेच संतापले. व्याघ्र प्रकल्पात प्राणी बघताना अनेकवेळा पर्यटक प्राण्याचे फोटो घेत असतात. पंरतु फोटो घेण्याच्या कृत्यावर प्राणी देखील वैतागत असतात. प्रायव्हसीला धोका वाटलं की प्राणी हल्ला करतात. बांदीपुरातही अशीच घटना घडलीय. हत्तीचा फोटो घेणाऱ्या पर्यटकाला गजराजनं शिक्षा केलीय. पर्यटकाला हत्तीने आपल्या पायाखाली तुडवलं. सुदैवाने हत्तीच्या हल्ल्यातून तो पर्यटक चमत्कारिकरित्या वाचवलाय.

हा पर्यटक केरळमधील असल्याचं सांगितलं जात आहे. हत्तीच्या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. ही घटना उटी-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ इतर पर्यटकांनी शूट केलाय. व्हायरल व्हिडिओमध्ये, रस्त्यावर अनेक वाहने आणि पर्यटक उभे असल्याचं दिसत आहेत.

रस्त्याच्या एका बाजुला हत्ती उभा आहे. त्याचवेळी महामार्गाच्या एका बाजुला उभे राहत एक पर्यटक फोटो घेण्याचा प्रयत्न घेतोय. त्यावेळी हत्ती पर्यटकावर हल्ला करतो. त्याला जमिनीवर ढकलत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हत्तीने पर्यटकाला पायाखाली तुडवले. सुदैवाने पर्यटक या हल्यातून बचावलाय.

मातृभूमीने दिलेल्या वृत्तानुसार, त्या माणसाने प्राण्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा गजराज संतापले आणि त्यांनी पर्यटकावर हल्ला चढवला. पाठीमागे हत्ती लागल्यानंतर तो पर्यटक धावू लागला. पळता पळता तो रस्त्यावर पडला. त्यानंतर हत्तीनं त्याच्या अंगावर पाय ठेवल्याचं दिसत आहे.

जास्त हल्ला न करता हत्ती तेथून निघून गेला. दरम्यान त्यानंतर पर्यटकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान फॉरेस्ट विभागाने पर्यटकाची ओळख जाहीर केली नाहीये. परंतु पर्यटकाची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT