
कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीणीच्या प्रकरणावरून जनआंदोलन आणि सोशल मीडियावर रोष.
सांगलीच्या तासगावमधील गौरी हत्तीणीसाठी वनताराकडून ₹3 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप.
गेल्या ४० वर्षांपासून मंदिर संस्थानकडून गौरीची सेवा सुरू.
वनतारावर हत्तीण तस्करी व प्राणी कल्याणाविरोधी वागणुकीचे गंभीर आरोप.
माधुरी हत्तीणीला वनतारातून परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी रान उठवलं. कुठे आंदोलनं झाली तर कुठे सोशल मीडियातून वनतारा आणि पेटाविरोधात आरोप-प्रत्यारोप झाले. माधुरीवरून वाद सुरू असतानाच आता सांगलीच्या तासगावमधील गौरी हत्तीणीवरून वनतारावर गंभीर आरोप करण्यात आलेत. गेल्या 40 वर्षांपासून तासगावमधील गणपती संस्थान गौरी हत्तीणीचा सांभाळ करते. मात्र याचं गौरीला वनतारात नेण्यासाठी तीन कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायतन संस्थानच्या विश्वस्तांनी केला आहे.
तासगावच्या गणपती संस्थानकडून वनतारावर काय आरोप करण्यात आलेत, पाहूयात.
कथित डॉक्टरकडून गौरी हत्तीणीला अनफिट असल्याचे सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न
कथित डॉक्टराबद्दल संबंधितांना पत्राद्वारे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष
हत्तीण नेण्यासाठी 2 ते 3 कोटींची विश्वस्तांना ऑफर
गेल्या 2 वर्षांपासून हत्तीणीच्या अपहरणाचा प्रयत्न
दरम्यान माधुरीनंतर तासगावची गजलक्ष्मी ऊर्फ गौरी हत्तीणीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सह्यांची मोहीम देखील राबविण्यात येणार आहे. मात्र वनताराकडून अद्याप याप्रकरणी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थानाच्या दाव्यानंतर सांगलीतही गौरी हत्तीणीसाठी स्थानिक सरसावले आहेत.त्यामुळे गौरी हत्तीणीसाठी सांगलीकर नेमकी काय भूमिका घेतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.