Viral video from Kanpur — Wife catches husband with girlfriend and beats her in public, creating chaos on the street. saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना बायकोनं पकडलं; झिपऱ्या धरून नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात लय चोपलं

Wife Beats Husbands Lover Video Viral: एका पुरुषानं लग्नानंतरही प्रेयसीसोबत संबंध ठेवले होते. या या दोघांना बायकोनं रंगेहात पकडलं आणि रस्त्यावरच बायको-प्रेयसीमध्ये हाणमारी झाली.

Bharat Jadhav

  • कानपूरमध्ये बायकोनं नवरा आणि प्रेयसीला रस्त्यात पकडलं.

  • बायकोनं प्रेयसीला बेदम मारहाण केली.

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बायको सोडून दुसरीसोबत रोमान्स करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्या पत्नीनं चांगलाच धडा शिकवलाय. भरस्त्यात दोघांना पकडून तिने त्याचा भांडाफोड केला. त्यानंतर नवऱ्यावर हक्क सांगणाऱ्या प्रेयसीला पत्नीने धु-धु धुतलं. भरस्त्यात झिपऱ्या पकडून नवऱ्याच्या प्रेयसीवर चापटींचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान घरवाली बाहरवालीच्या हाणमारीचा व्हिडिओ @TrueStoryUP या X अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ही घटना कानपूरमधील महाराजपुर या ठिकाणी घडल्याचं सांगितलं जात आहे. नरवल मोड परिसरातील एका रस्त्यावर दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. महिलेला आपल्या नवऱ्यावर खूप दिवसांपासून संशय होता.

नवरा दुसऱ्या महिलेच्या प्रेमात असल्याचा तिला संशय होता. त्यामुळे ती त्याच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होती. एके दिवशी नवरा खोटं बोलून प्रेयसीला भेटायला गेला. त्यावेळी बायकोनं त्याचा पाठलाग करत त्याला रंगेहाथ पकडलं. त्यावेळी रस्त्यात तिघांमध्ये राडा झाला.

आधी नवऱ्यानं सुरुवातीला बायकोच्या थोबाडीत मारली आणि तिला घरी जाण्यासाठी सांगितलं. पण त्यामुळे बायको आणखी चिडली. तिने नवऱ्याकडून थेट त्याच्या प्रेयसीकडे मोर्चा वळवला. नवऱ्याच्या प्रेयसीच्या झिपऱ्या पकडून एकामागून एक तिच्या कानाखाली मारल्या. दोन्ही महिलांमध्ये तुफान राडा झाला. कोणीच माघार घेईन. इतकेच काय ज्याच्यासाठी त्या भांडत होत्या त्याचेही ते ऐकेनात. दरम्यान या हाणामारीच व्हिडिओ आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिलाय. नवऱ्याविरोधात बायकोनं पोलीस तक्रार करावी असा सल्ला नेटकऱ्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Pune : ऊसाच्या शेतात लपलेला नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार, शिरूरमध्ये तिघांचा घेतला होता जीव

SCROLL FOR NEXT