Crime News: कमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली सुपारी, माजी महामंडलेश्वरचं भयानक कृत्य

Former Mahamandaleshwar Kill Young Man: माजी महामंडलेश्वर पूजा शकुन पांडे उर्फ ​​अन्नपूर्णा भारती हिला अटक करण्यात आली आहे. एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने उत्तर प्रदेशातील धार्मिक ढोंगीपणाची काळी बाजू उघडकीस आणली आहे.
Former Mahamandaleshwar  Kill Young Man
Former Mahamandaleshwar Pooja Shakun Pandey arrested in Aligarh for hiring a shooter to kill a young man who distanced himself from her.x
Published On
Summary
  • माजी महामंडलेश्वर पूजाशकुन पांडे अटक.

  • अलिगडमध्ये तरुणाच्या खुनाचा धक्कादायक प्रकार.

  • तरुणानं ब्लॉक केल्यानंतर आरोपी महिलेचा सूड.

उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिलेनं एका तरुणाची घडवून आणली. एका शुटरला सुपारी देत तरुणाची हत्या घडवून आणली याप्रकणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा शकून पांडेय, असं या आरोपी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला माजी महामंडलेश्वर होती. धर्म, कर्म, उपासना याबाबत प्रवचने द्यायची. पण आता तिच्या अंगातील सैताननं एका तरुणाचा जीव घेतला.

या अधिक माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अभिषेक गुप्ता आहे. अभिषेक गुप्ता आरोपी महिला पूजा शकून पांडेय हिच्यापेक्षा लहान होता. दोघांच्या अभ्यासाच्या बहाण्याने भेटीगाठी सुरू झाल्या. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबध प्रस्थापित झाले. मग आरोपी महिला अभिषेकला घरी बोलून घ्यायची. घरात त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवायची.

Former Mahamandaleshwar  Kill Young Man
Student Death : 10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू

मात्र काही काळानंतर अभिषेक त्या संबंधांना कंटाळला. त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली. तिचा नंबर बंद करून तिला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं. अभिषेक आपल्याला टाळत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर आरोपी महिला संतापली. तिने पती अशोक पांडेय याच्यासोबत मिळून अभिषेकचा काटा काढण्याचा कट रचला.

Former Mahamandaleshwar  Kill Young Man
हॉटेल रूम, ३ तरूणी अन्...; नागपुरातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, बनावट कस्टमरकडून भंडाफोड

पूजा आणि तिचा नवरा अशोक पांडेय यांनी अभिषेक गुप्ताच्या हत्येची सुपारी एका शूटरला दिली. या हत्येनंतर पोलिसांनी अशोक पांडेय आणि एका शूटरला अटक केली. मात्र पूजा शकून पांडेय ही फरार झाली. तसेच हरिद्वार येथे साध्वीचा वेश घेऊन लपली होती. अखेर अलिगड पोलिसांना सातत्याने पाठलाग करून तिला शोधून काढले आणि तिला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com