Student Death : 10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू

Crime दोन पोलीस कॉन्स्टेबलकडून करण्यात आलेल्या मारहाणीमध्ये एका बीटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BTech Student Death
BTech Student Deathx
Published On
Summary
  • दोन पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत बीटेक विद्यार्थ्याचा मृत्यू.

  • पोलिसांनी १० हजार रुपयांची मागणी करत विद्यार्थ्याला केली मारहाण

  • आरोपी दोन्ही कॉन्स्टेबल निलंबित; प्रकरणी गुन्हा दाखल.

Shocking : पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण बीटेकचे शिक्षण घेत होता. या मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कॉन्स्टेबल या तरुणाला पकडून उभा आहे, तर दुसरा त्याला काठीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाते. ही घटना मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये घडली आहे.

मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव उदित गायके असे आहे. या घटनेनंतर भोपाळ झोन-२ चे डीसीपी विवेक सिंह यांच्या सूचनेनुसार, दोन्ही आरोपी कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना लवकरच अटक केली जाईल असे विवेक सिंह यांनी सांगितले.

BTech Student Death
Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

मृत विद्यार्थ्याच्या मित्राने या घटनेची माहिती दिली. तो म्हणाला, 'सर्व मित्र रात्री इंद्रपुरी परिसरात पार्टी करत होते. दीडच्या सुमारास घरी परतताना उदितने रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलिसांना पाहिले. तो घाबरून एका गल्लीत पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून बेदम मारहाण करायला सुरुवात केली'

BTech Student Death
MNS : पतीला मारहाण, मराठीवरुन शिवीगाळ; मनसे पदाधिकारी पत्नीने परप्रांतीय महिलेला दाखवला इंगा | VIDEO

जेव्हा उदितने हात जोडून पोलिसांकडे 'मला मारु नका' असे म्हणत विनवणी केली. तेव्हा त्या दोघांनी उदितकडे १०,००० रुपयांची मागणी केली. दोघे त्यांना मारहाण करत राहिले. त्यानंतर उदितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, असे उदितच्या मित्राने सांगितले.

BTech Student Death
Politics : निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका, बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले. त्याच्यावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात पोलीस कॉन्स्टेबल दोषी आढळले आहेत. हत्येच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डीसीपी विवेक सिंह यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

BTech Student Death
Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com