MNS : पतीला मारहाण, मराठीवरुन शिवीगाळ; मनसे पदाधिकारी पत्नीने परप्रांतीय महिलेला दाखवला इंगा | VIDEO

Mumbai News : कळवा रेल्वे स्थानकाजवळ मराठी माणसाला परप्रांतीय महिलेकडून मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने मनसे जनसंपर्क कार्यालयात महिलेला चांगला इंगा दाखवला.
mumbai news
mumbai newsfacebook
Published On
Summary
  • कळवा रेल्वे स्टेशन परिसरात एका परप्रांतीय महिलेने मराठी पुरुषाला धक्काबुकी करत शिवीगाळ केली.

  • परप्रांतीय महिलेकडून मारहाण झालेले अर्जुन काटे यांच्या पत्नी स्वरा काटे या मनसे पदाधिकारी आहेत.

  • मनसे पदाधिकारी स्वरा काटे यांनी तिला जनसंपर्क कार्यालयात आणून माफी मागायला लावली.

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai : मुंबईमध्ये मराठी आणि मराठी माणसांचा द्वेष करणारे अनेकजण पाहायला मिळतात. अशा मराठीद्वेषी परप्रांतीयांकडून मराठी माणसांना त्रास दिल्याची अनेक घटना पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना कळवा रेल्वे स्थानक परिसरात घडली. एका परप्रांतीय महिलेने अर्जुन काटे यांना धक्का दिला. यावरुन विचारणा केल्यानंतर महिलेने अर्जुन यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तिने मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले.

अर्जुन काटे यांच्या पत्नी स्वरा काटे यांनी मारहाण करणाऱ्या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयात नेले. स्वरा काटे या मनसे पदाधिकारी आहेत. त्यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसमोर त्या महिलेला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची माफी मागायला लावली. जनसंपर्क कार्यालयातील व्हिडीओ सोल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान मनसेने या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

'महाराष्ट्रामध्ये राहून मराठी द्वेष बाळगून मराठी माणसाला डिवचण्याचे परिणाम काय होतात ते दाखवून देणे गरजेचे आहे. अशीच एक घटना कळवा स्टेशन परिसरात घडली. मनसे पदाधिकारी स्वरा काटे यांचे पती अर्जुन काटे हे रेल्वेमधून उतरताना रेल्वेच्या स्थानिक परिसरात चालताना परप्रांतीय महिला मागून धक्का मारत मारत जात होती. त्यात तिचा धक्का लागला, तिने मागून ढकलले. अर्जुन काटे यांनी त्या बाबत मराठीत त्वरित विनंती केली मॅडम धक्का मारत जाऊ नका नीट जावा, असे म्हटले.'

mumbai news
BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

'परंतु त्या महिलेने मराठीत बोलल्यामुळे अर्जुन काटे यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करून मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले व मारहाण केली. तसेच इतर लोकांना ही शिवीगाळ केली. अर्जुन यांनी त्यावेळी काही उलट उत्तर न देता थेट पोलिस स्टेशन गाठले व पुढील कारवाई केली. परंतु या महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना अद्दल घडवणे गरजेचे होते. म्हणूनच मनसे पदाधिकारी स्वरा काटे व त्यांचे पती त्या महिलेला मनसे जनसंपर्क कार्यालय येथे घेऊन आले व त्या महिलेला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची माफी मागायला लावली. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला डिवचले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामध्ये कोणतीही तडजोड करणार नाही मग ते कोणीही असो यांचा माज उतरवणार हे नक्की. या निमित्ताने सर्व अमराठी लोकांना ही समज देत आहे की महाराष्ट्रात राहत आहात तर प्रेमाने राहा. मराठी माणसाच्या नादी लागू नका...जय महाराष्ट्र' अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

mumbai news
Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला बसणार धक्का, ५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com