HAS Officer Oshin Sharma Controversy: पुण्यातील बडतर्फ ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात गाजत आहे. पूजा खेडकर यांच्या प्रतापांची अन् फसवणूकीचे अनेक किस्से समोर आले अन् प्रशासकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता आणखी एक वादग्रस्त लेडी अधिकारी चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या हिमाचलच्या लेडी एचएएस अधिकारी ओशिन शर्मा यांची सरकारने बदली केली असून आपल्या कामामुळे सध्या त्या वादात सापडल्या आहेत.
हिमाचल प्रदेशच्या संधोळ येथील तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या शर्मा यांची सिंधू सरकारने बदली केली आहे. विशेष म्हणजे ओशिन शर्मा यांना सध्या कोणत्याही ठिकाणी नियुक्त करू नये आणि शिमल्यातील कार्मिक विभागाला अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, काही दिवसांपूर्वीच एसडीएम धरमपूर यांनी ओशिन शर्मांच्या कामावर असमाधान व्यक्त केले होते. अनेक त्रुटी लक्षात घेऊन त्यांना डीसीने ही नोटीस बजावली होती आणि त्यावर उत्तर मागितले होते.
दुसरीकडे ओशिनने तिच्या असमाधानकारक कामाशी संबंधित कथित अहवालांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ओशिन महिलांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील कार्य करते. त्यांच्या सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे त्यांचे प्रशासकीय आणि समाजसेवेच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांची तडकाफडकी बदली केल्याची चर्चा सध्या होत आहे.
दरम्यान, ओशिन शर्मा या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचे 3.45 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या नियमितपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परीक्षेची तयारी आणि इतर विषयांशी संबंधित व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करते. बांगलादेशापासून आरक्षणापर्यंतचे त्यांचे व्हिडिओ लाखो वेळा पाहिले गेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.