Himachal Pradesh News : पालकांनो काळजी घ्या! फुगा खेळता खेळता भयंकर घडलं, १३ वर्षीय मुलाने गमावला जीव

Boy Death Due to Balloon Stuck In Throat : घश्यात फुगा अडकल्यामुळे १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. ही घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडलीय.
फुग्यामुळे १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
Boy Death Due to Balloon Saam Tv
Published On

मुंबई : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा गळ्यात फुगा अडकल्याने मृत्यू झालाय. घश्यात फुगा अडकल्यामुळे मुलाची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला पठाणकोट येथील खासगी रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी त्याच्या घश्यामध्ये अडकलेला फुगा काढला. मात्र, त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. काल ६ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास या मुलाचा मृत्यू झालाय.

तुमच्याही मुलांनी फुग्यासोबत खेळायला आवडत असेल, तर ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. एका फुग्याने तेरा वर्षीय चिमुरड्याचा जीव घेतलाय. दोन दिवस या मुलाने हॉस्पिटलमध्ये मृत्युसोबत झुंज दिली, पण अखेर त्याचा मृत्यू (Shocking Incident) झालाय. ही घटना हिमाचल प्रदेशामधील कांगडा जिल्ह्यातील आहे.

नेमकं काय घडलं?

कांगडा जिल्ह्यात १३ वर्षांचा विवेक कुमार सिद्धपूरगडमधील सरकारी शाळेत शिकत होता. नेहमीप्रमाणे विवेक गुरुवारी देखील शाळा संपल्यानंतर घरी निघाला होता. खेळता खेळता त्याने शाळेच्या गेटवरच फुगा फुगवायला सुरूवात (Boy Death Due to Balloon Stuck In Throat) केली. अचानक फुग्यात हवा आली आणि फुगा विवेकच्या तोंडात गेला. यावेळी विवेकच्या घश्यामध्ये हा फुगा अडकला होता. शाळेतील शिक्षकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्याला पंजाबमधील पठाणकोट येथील अमनदीप रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी विवेकच्या गळ्यातील फुगा काढला होता. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक (Boy Death) होती. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास विवेकनं अखेरचा श्वास घेतला.

फुग्यामुळे १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
Vanraj Aandekar Death: 'मारा मारा... दोघांनाही सोडू नका', वनराज आंदेकरांच्या बहिणीनेच दिली चिथावणी; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

विवेकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कांगडा येथील जावली येथील माजी आमदार नीरज भारती यांनी मृत मुलाच्या कुटुंबाला मदत (Himachal Pradesh) केलीय. नीरज भारती यांनी मुलाच्या उपचारासाठी ५० हजार रुपये दिले होते. याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली होती, परंतु तरीही मुलाचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर विवेकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. फुग्यासोबत खेळताना अशी काही दुर्घटना घडू शकते, असा विचार देखील सहसा कोणाच्या मनात येत नाही. मात्र १३ वर्षांचा विवेकचा फुग्याने बळी घेतलाय.

फुग्यामुळे १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
Gadchiroli Child Death Case : चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com