Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये महिला कर्मचारी १६, दिव्यांग कर्मचारी १० तर युवा अधिकारी कर्मचारी ११ असे एकूण ३७ मतदान केंद्र संपूर्णपणे सांभाळणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
Election commissioner of india
Election commissioner of indiaSaam Tv

Lok Sabha Election 2024:

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये महिला कर्मचारी १६, दिव्यांग कर्मचारी १० तर युवा अधिकारी कर्मचारी ११ असे एकूण ३७ मतदान केंद्र संपूर्णपणे सांभाळणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर आता प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज होत आहे.

मतदान केंद्रांवर द्यावयाच्या विविध सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात महिला, दिव्यांग व युवा अधिकारी कर्मचारी संपूर्णपणे मतदान केंद्र सांभाळणार आहेत. त्यात महिला अधिकारी-कर्मचारी १६,दिव्यांग अधिकारी कर्मचारी १०, युवा अधिकारी कर्मचारी ११ असे एकूण ३७ मतदान केंद्र संपूर्णपणे याच अधिकारी कर्मचाऱ्यांकडून संचलित होतील. यासोबतच पर्यावरण पूरक मतदान केंद्र तयार करण्याचेही प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर कचरा कुंडी देण्यात येणार आहे.

Election commissioner of india
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करण्यात येणार आहे, ‘चला चला मतदानाला’, हा उपक्रम त्यासाठी राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्र तसेच मतदानाबाबत सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्थेचा वापर करुन लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांचा अहवाल दि.६ पर्यंत मागविण्यात आला आहे. मतदानाविषयी उत्सूकता निर्माण व्हावी यासाठी मतदान केंद्र स्थापनेबाबत गाजावाजा करावा, जेणेकरुन लोकांना कळावे. त्यांना मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत माहिती देण्यात यावी. मतदान केंद्र हे गावापासून दूर अथवा जवळ, असे कोठे असेल त्यानुसार लोकांना मतदान केंद्राबाबत माहिती पोहोचवावी,असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहे.

Election commissioner of india
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

याशिवाय मतदार सहायता केंद्र, मतदान चिठ्ठ्यांचे वाटप इ. बाबत काम सुरु आहे,असे त्यांनी सांगितले. उमेदवारांची संख्या वाढल्याने ४८९८ मतदान यंत्रे जादा लागणार आहेत. ते दाखल झाले असून त्यांचे प्रथम स्तरीय तपासणीसाठी १२ इंजिनिअर्स दाखल झाले असून आज अखेर हे काम पूर्ण होईल असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.आचारसंहिता भंग वा निवडणूक अनुषंगाने घडणाऱ्या घटनांच्या बाबत गुप्तचर विभागामार्फत सर्व हालचालींवर नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com