Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video: ना घोडा ना गाडी, लग्नाचा मूहूर्त टळू नये म्हणून नवरदेवाने थेट पकडली मेट्रो; VIDEO व्हायरल

Viral Video: लग्न म्हटल्यावर घरात खूप जास्त आनंदाचे वातावरण असते. मात्र, मज्जा मस्तीसोबतच लग्नाची तयारी करताना सर्वांचीच गडबड होते. अशीच गडबड एका लग्नघरात झाली आहे.या कुटुंबाने लग्नाचा मूहूर्त टळू नये म्हणून मेट्रोने प्रवास केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Groom Travel By Mumbai Metro At Wedding Venue:

लग्न म्हटल्यावर घरात खूप जास्त आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे धम्माल, मज्जा, मस्ती सुरू असते. मात्र, मज्जा मस्तीसोबतच लग्नाची तयारी करताना सर्वांचीच गडबड होते. अनेकदा बऱ्याच गोष्टी विसरतात. तर कधी मूहूर्तावर विधी होत नाही. त्यामुळे खूप गोंधळ उडतो. असाच एका लग्नातील मूहूर्त गाठण्यासाठी गोंधळ झालेल्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

लग्नात मूहूर्तावर सर्व विधी होणे खूप गरजेचे असतात. मूहूर्तावर लग्न होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. असाच एका नवरदेवाने लग्नाचा मूहूर्त टळू नये यासाठी चक्क मेट्रोने प्रवास केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका कुटुंबाची मूहूर्त टळू नये यासाठी होणारी धडपड दिसत आहे. मूहूर्तावर नवरदेव विवाहस्थळी पोहचावा यासाठी संपूर्ण कुटुंबियांनी मेट्रोने प्रवास केला आहे. नऊवारी साड्या, दागिने असा मराठमोळा लूक करुन नवऱ्याच्या नातेवाईकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. तर नवरदेवाने धोतर, कुर्ता, उपरणं आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून मेट्रोने प्रवास केला आहे.

abhishhastra_by_shillparaje's या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'लग्नाच्या दिवशी मूहूर्ताच्या वेळेवर पोहचण्यासाठी वऱ्हाडीमंडळीनी मुंबई मेट्रोने (Mumbai Metro)प्रवास केला आहे. लग्नाच्या दिवशी वेस्टर्न रोडवर खूप जास्त ट्राफिक होते. त्यामुळे नवरदेव, करवली, वरमाई आणि वऱ्हाड्यांनी मेट्रोने विवाहस्थळी पोहोचले',असं कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT