she hugged the bride then stunned everyone by slapping the groom viral wedding drama leaves guests speechless Saam Tv
व्हायरल न्यूज

अर्रर्र! एक्स गर्लफ्रेंडची लग्नात अचानक एन्ट्री; नवरीला मिठी मारली अन् नवरदेवाला कानशिलात लगावली

Wedding Viral Video: लग्नात सगळे आनंदात होते, पण अचानक एक बाई आली, नवरीला मिठी मारली आणि नवरदेवाच्या कानशिलात लगावली. पाहुणे बघ्याची भूमिका घेत अवाक झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Tanvi Pol

Wedding Fight Video: लग्न म्हटलं की आनंद, हशा आणि आठवणींचं समिकरण असतं, पण काही वेळा या आनंदाच्या क्षणी काही असं घडतं की सगळ्यांचं लक्ष तिकडेच वळतं. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरमंडपात चाललेल्या या लग्नसोहळ्यात नवरदेवाला असा काही चापट बसला की पाहणाऱ्यांचीच शुद्ध हरपली.

हा प्रकार एका ग्रामीण भागातील विवाह(Weeding) सोहळ्यात घडला. नवरदेव स्टेजवर नवरीसोबत लग्न विधीसाठी उभा होता. लग्नाचे विधी पार पडत होते. वरमाल्यांची देवघेव झाल्यानंतर अचानक एक तरुणी स्टेजवर आली. पाहता पाहता तिने नवरीला मिठी मारली आणि क्षणातच नवरदेवाच्या गालावर जोरदार कानशिलात लगावली.

या सगळ्या प्रकाराने स्टेजवरील लोक, नातेवाईक आणि पाहुणे अवाक झाले. काही क्षणांसाठी कार्यक्रम थांबला. काहींनी तर या मुलीला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला पण तिने ठामपणे आपली भूमिका मांडली. काहींनी क्षणात सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावरही व्हायरल केलेला आहे.

हा व्हिडिओ(Video) एक्सवरील(ट्वीटर)@Meenaks06356943 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी अनेक गमंतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, एका यूजरने म्हटलं,''असंच पाहीजे'' दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे,''देवा काय झालं असेल पुढे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कल्याणमध्ये मांसविक्री बंदीवरून आंदोलन; तणावाचे वातावरण

Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

SCROLL FOR NEXT