अर्रर्र! भररस्त्यात पत्नी परपुरुषासोबत रंगेहात पकडली गेली; पतीच्या संतापाचा थरकापजनक व्हिडीओ व्हायरल

Husband Catches Wife Cheating: भररस्त्यात पतीने पत्नीला परपुरुषासोबत पाहिलं आणि संतापला. संतापाच्या भरात त्याने दोघांना पकडताच जोरदार गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Moment when husband confronts his wife and her alleged lover on a public street – scene caught live on camera.
Moment when husband confronts his wife and her alleged lover on a public street – scene caught live on camera.
Published On

Extramarital Affair Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये एक पती आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडताना दिसतो. या घटनेनंतर रस्त्यावर मोठा गोंधळ उडाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. पतीचा संताप इतका जबरदस्त होता की रागाच्या भरात त्याने त्या परपुरुषाशी थेट झटापट केली. ही घटना पाहणाऱ्या नागरिकांच्या नजरा स्तब्ध झाल्या आणि काहींनी मोबाईलवर संपूर्ण प्रसंग शूट करून सोशल मीडियावर टाकला.

नेमकी घटना काय घडली?

ही घटना भारतातील एका मोठ्या शहरात असल्याचे सांगितले जात आहे,मात्र याची खात्री होऊ शकली नाही. व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक महिला एका परपुरुषासोबत रस्त्याच्या कडेला उभी आहे. काही मिनिटांत तिचा नवरा अचानक तिथं पोहोचतो आणि या दोघांना एकत्र पाहताच संतापतो. तो दोघांवर जोरजोरात ओरडायला लागतो. त्यानंतर त्याने त्या पुरुषाला हिसकावून धरलं आणि दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू होते.

पतीचा संताप अनावर!

पत्नीवर विश्वास ठेवून संसार करणाऱ्या पतीला जेव्हा तिच्या प्रेमात फसवणुकची भनक लागली ,तेव्हा त्याने ठरवूनच तिचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. त्याला तिच्यावर काही काळापासून संशय होता. तो तिच्या हालचाली, फोनवरचे संवाद, आणि बदललेले वागणे त्याच्या लक्षात आलं होतं. शेवटी एका मित्राच्या मदतीने त्याने तिचा पाठलाग केला आणि हे सर्व प्रत्यक्ष पाहिलं.

घटनेचे सोशल मीडियावर पडसाद

या घटनेचा व्हायरल व्हिडीओ(Video) सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, आणि ट्विटरसह (एक्स) विविध प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी या घटनेवर आपली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी पतीच्या संतापाला योग्य म्हटलं आहे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या वादाला अयोग्य ठरवलं आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Moment when husband confronts his wife and her alleged lover on a public street – scene caught live on camera.
लफडेबाज नवरा गर्लफ्रेंडसोबत रूममध्ये, बायकोनं रंगेहात पकडलं, दृश्य पाहून हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com