Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

Manoj Jarange Begins Hunger Strike: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. भर उन्हात त्यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणादरमयान सरकारने मोठी कारवाई करत एका बड्या अधिकाऱ्याला निलंबित केलं.
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On
  • मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले

  • कुणबी प्रमाणपत्र प्रकरणातील अधिकारी निलंबित

  • अंतरवाली सराटीमध्ये ते उन्हामध्ये उपोषणाला बसलेत

  • मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारची भूमिका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे शेतामध्ये भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेत. शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. पण २ तासांची चर्चा सुद्धा निष्फळ ठरली. त्यानंतर आज मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महत्वाची माहिती दिली. कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असल्याचे त्यांनी जरांगेंना सांगितले.

मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण सुरू केले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आंतरवली सराटीमध्ये दाखल होत त्यांनी जरांगेकडे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. यावेळी विखे-पाटील यांनी मनोज जरांगे यांना शासनाचा ड्राफ्ट देखील दाखवला. कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी जरांगे यांना जरांगे यांना सांगितले. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी पातळीवर काय तयारी सुरू आहे याची माहिती देखील त्यांनी जरांगे यांना सांगितली.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन
Manoj Jarange: 'उष्माघातामुळे बळी गेला तर फडणवीसामुळेच', मनोज जरांगेंचा सरकारला अखेरचा अल्टिमेटम

सरकारकडून पुन्हा मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण ते आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितली, 'मी उपोषण सोडणार नाही. मी उन्हातच बसेन. मी बसलो तर सरकारला चटके लागतील. त्यामुळे मला बसावं लागेल. संध्याकाळी महाराष्ट्रातून अभ्यासक येतील. ते आल्यावर आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू. चर्चेनंतरच बोलूया असं मनोजअसंही जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन
Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे ४ तासांपासून उन्हात आमरण उपोषण सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मराठा बांधव देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उन्हात बसून आहेत. सरकारने ड्राफ्ट दिल्यानंतर सायंकाळी ५ वाजता अभ्यासकांची बैठक होणार असून रात्री ८ वाजता मनोज जरांगे पाटील सरकारला त्यांची भूमिका सांगणार आहे.

जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील हे जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. जालन्याचे अप्पर जिल्हाधिकारी आणि अंबडचे तहसीलदार देखील जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे . मनोज जरांगे यांना प्रशासनाच्या वतीने सावलीत उपोषण करण्याची विनंती करण्यात आली. तर डॉक्टरांना तपासणी करून देण्याची देखील विनंती प्रशासनाने केली.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन
Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com