Water Park Accident Saam Tv
व्हायरल न्यूज

Water Park Accident: विकेंडला मजा करायला गेला, पण परतलाच नाही! रिसॉर्टमधील भीषण घटना

Water Park Accident Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या तसाच एक भयानक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमके घडले काय ते पाहा.

Tanvi Pol

Water Park Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरुणाचा रिसॉर्टमधील शेवटचा क्षण कैद झाला आहे. नेहमीप्रमाणे विकेंडला मजा करण्यासाठी काही मित्रांनी रिसॉर्टला जाण्याचा प्लॅन केला. उन्हाच्या तापापासून थोडा आराम मिळावा म्हणून सगळे एका प्रसिद्ध वॉटर रिसॉर्टमध्ये गेले. स्लाइड्स, फोटो सेशन्स, धमाल यामध्ये सगळे मग्न होते. मात्र एका चुकीमुळे संपूर्ण वातावरणच शोकमय झालं.

मित्रांसोबतचा प्लॅन अखेरचा ठरला

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वॉटर पार्कमधील नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. पुढे व्हिडिओमध्ये एक तरुण स्विमिंग पूलमध्ये येण्यासाठी तेथील राईडसाठी तयार होत असते. काही वेळानंतर तरुण त्या राईडमधून थेट पूलामध्ये येतो. नेमकी त्याच वेळी अचानक एक तरुणमध्ये येतो. राईडवरील तरुण वेगाने खाली आल्याने त्याचा झटका पाण्यातील तरुणाला बसतो आणि तो पाण्यात बुडतो. बराच वेळ वर न आल्यानं अनेकजण त्याला पाण्यात जाऊन पकडतात. मात्र तरुण गंभीर जखमी झाला होता.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वॉटर पार्कमधील सर्व घटना सध्या वाऱ्याच्या वेगाने इन्स्टाग्रा, ट्वीटर आणि फेसबूक अशा प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांना इन्स्टाग्रावरील
news_mp_09_21या अकाउंटवर पाहता येत आहे. त्यानंतर व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूजही मिळाले आहेत तर अनेकांनी इतरांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ व्हाट्सएप स्टेटसला देखील ठेवलेला आहे.

नेमकी ही घटना कुठल्या शहरातील आहे आणि कधीची आहे समजू शकलेले नाही. पण हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. काहींनी त्यांची मतं देखील व्यक्त केलेली आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खूपच अचानक असं झालं'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''प्रत्येकाने सावध राहाणे किती महत्त्वाचे आहे ते या व्हिडिओतून कळते'' शिवाय अनेकांनी खूप भयानक (Shocking)झाले अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT