Toll Plaza Incident: वादळी वाऱ्याचा कहर! टोलनाक्यावरचं छत अवघ्या ७ सेकंदात आकाशात पतंगासारखं उडालं; CCTV

Tin Shed of Bhilwara Toll Post Blown Away: सोशल मीडियावर सध्या राजस्थानमधील एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ एका टोल नाक्यावरील आहे. जिथे नेमके काय घडले ते एकदा पाहा.
Tin Shed of Bhilwara Toll Post Blown Away
Toll Plaza IncidentSaam Tv
Published On

Rajasthan Viral Video: निसर्गाचा रौद्र अवतार किती भयावह असू शकतो, याचा प्रत्यय एका टोल नाक्यावर आलेल्या थरारक घटनेतून आला. राष्ट्रीय महामार्गावरील एका टोल प्लाझावर अवघ्या ७ सेकंदांत घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. एक क्षण शांतता, आणि पुढच्याच क्षणी आकाशात उडणारं छत ही दृश्यं अक्षरशः चित्रपटातील वाटावी अशीच होती.

घटनेच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात कडक ऊन तापलेलं होतं. दुपारीपर्यंत तापमान साधारण ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं.मात्र, अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग जमू लागले आणि काही वेळातच सोसाट्याचा वारा सुरु झाला. क्षणार्धात काळोख पसरला आणि मुसळधार पावसासह(Rain) वादळ सुरू झालं.

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे अवघ्या ७ सेकंदांत टोल प्लाझाचं छत अचानक हवेत उडालं, जणू काही पतंग उडावी. छत कोसळलं मात्र, त्यावेळी सुदैवाने तिथे वाहनांची गर्दी नव्हती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही घटना किती भीषण होती हे व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल.

सर्व घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाली असून काही सिकेंदात देशभरात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल(Viral) झाली. कोणी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहिला तर कोणी फेसबूक, एक्स( ट्वीटर) पाहिला आहे शिवाय यावर अनेक त्यावर हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Tin Shed of Bhilwara Toll Post Blown Away
Shocking Video: भयंकर! ब्रिजवरून तारेवर लटकला आणि थेट रेल्वे रूळांवर कोसळला; थरार पाहून हादराल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com