पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये अनेकदा वाढ होताना दिसते. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरीपार गेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावामुळे काही जण इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक कारचा वापर करताना आपण पाहतो. पण एका पठ्ठ्याने थेट देसी जुगाड केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडली असताना, दिल्लीच्या एका तरुणाने म्हशीवर बसून रस्त्यावर प्रवास करताना दिसत आहे. सध्या त्या माणसाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वाढत्या महागाईमुळे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत एका पठ्ठ्याने जबरदस्त जुगाड करत वाढत्या महागाईवर रामबाण उपाय शोधला आहे. सध्या याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा होताना दिसतेय. व्हायरल व्हिडीओमध्ये, हा माणूस रस्त्यावर थेट म्हशीला घेऊन आलेला दिसत आहे. त्या सोबतच त्याने ससाची डिझाईन असलेला हेल्मेट घातलेला दिसत आहे. (Social Media)
हा हटके व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘bull_rider_077’ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. हा व्हायरल व्हिडीओ त्या युजरने २५ नोव्हेंबरला शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘पेट्रोल महाग झालंय तर मी पण पेट्रोल वापरणं बंद केलंय’ असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून लाखो लाईक्स मिळाले आहेत. शेकडो युजर्सने व्हिडीओवर कमेंट सुद्धा केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून व्हिडीओला चांगला प्रतिसादही मिळत आहे. (Viral Video)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ‘तुझ्या सारखा जर लोकांनी विचार केला तर, नक्कीच पेट्रोलचे भाव कमी होतील.’, ‘स्वस्तातला यमराज दिसत आहेस तू मित्रा’, ‘पेट्रोलपेक्षा याचाच जास्त खर्च आहे, काय परवडणार आहे मग? ’, ‘अशा भन्नाट व्हिडीओ पाहण्यासाठीच मी २३९ रुपयांचा रिचार्ज करते.’ अशा संमिश्र प्रतिक्रिया चाहते देत आहेत. हा युजर गेल्या अनेक दिवसांपासून हटके व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसत आहे. त्याच्या व्हिडीओंची चर्चा फक्त इन्स्टाग्राम वरच नाही तर, युट्यूबवरही पाहायला मिळत आहे. (Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.