Petrol Diesel Price : राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता?; वाचा तुमच्या शहरात आज पेट्रोलच्या किंमतीमध्ये झालेला बदल

पेट्रोल ९६.९३ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८९.८० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. विविध शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०८ रुपयांहून अधिक वाढले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होताना दिसत आहे. आज (सोमवारी) सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, जागतिक बाजारात क्रूडच्या किंमती प्रति बॅरल ७५ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. अशात पटनामध्ये पेट्रोलच्या दराने उच्चांकी गाठली असून दिल्ली आणि मुंबई अशा शहरांमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel News)

आज समोर आलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात मुंबई आणि दिल्ली या शहरांमधील दर कायम आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यूपीची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये मात्र पेट्रोचे दर वाढले आहेत. या शहरात पेट्रोल १० पैशांनी महाग झाले आहे. पेट्रोल ९६.५७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर कालच्या सारखाच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price Today
Crime News : गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला व्हिडिओ

पाटणामध्ये आज पेट्रोल ३२ पैशांनी महागले आहे. १०८.१२ रुपये प्रति लीटरवर पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. तसेच डिझेल ३० पैशांनी महागले आहे. ९४.८६ रुपये प्रति लीटरवर डिझेलने उच्चांकी गाठली आहे. गुरुग्राममध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ४ पैशांनी वाढ झाली आहे. आज पेट्रोल ९६.९३ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८९.८० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझलचे दर वाढले की कमी झाले?

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता या चारही महानगरांमधील पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

  • आज मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे.

  • दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.४२ रुपये प्रति लिटर आहे.

  • कोलकातामध्ये देखील पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

Petrol Diesel Price Today
Nagpur Crime News : अवघ्या ९ दिवसांच्या चिमुकलीची अडीच लाखात विक्री; धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं...

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

आगामी काळात मुंबई (Mumbai) महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये कपातीची खेळी खेळणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या तर देशातील महागाईवर नियंत्रण ठेवता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com