प्रविण वाकचौरे
पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल भरता त्यावेळी तुम्ही तिथे काही अधिकार मिळतात, याची माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार आहे.
पेट्रोल किंवा डिझेलची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक किंवा कर्मचारी यांना फिल्टर पेपर चाचणीसाठी विचारू शकता.
तुम्हाला योग्य प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल दिले जात आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपाने पेट्रोल किंवा डिझेलचे प्रमाण मोजण्यासाठी 5 लिटर जार ठेवलेले असतात.
तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल खरेदीचा कॅश मेमो विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडे याची मागणी करू शकता.
तुम्ही खरेदी करत असलेल्या पेट्रोल किंवा डिझेलची घनता जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हे पेट्रोल व्हेंडिंग मशीनवरही लिहिलेले असते.
तुम्हाला पेट्रोल पंपावर काही मोफत सेवा मिळण्याचा अधिकार आहे, ज्यात की पेट्रोल पंपाने तुमच्या वाहनासाठी टायर प्रेशरची हवा मोफत पुरवावी.
ग्राहकांना आवश्यकता असेल तर प्रथमोपचार पेटी उपलब्ध करुन द्यावी.