Monday Horoscope: कामात कौतुकाची थाप मिळेल, 5 राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी संधी

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज मन अस्थिर राहू शकते, छोट्या कामांतही लक्ष लागणार नाही. खर्च अचानक वाढू शकतो, त्यामुळे जपून खर्च करा आणि वाद टाळा.

मेष राशी | saam tv

वृषभ

पैशांबाबत जास्त विचार कराल, अनपेक्षित रक्कम मिळू शकते पण टिकणार नाही. प्रेमसंबंधात अंतर जाणवेल, संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

थकवा आणि चिडचिड जाणवू शकते, शब्दांवर नियंत्रण ठेवा. नवीन काम सुरू करू नका, सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कुटुंबातून चांगली बातमी मिळू शकते, मन हलके राहील. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा, आरोग्याची काळजी घ्या.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

आज सुस्ती जाणवेल, बाहेर जाताना सावध रहा. प्रेमसंबंधात गोडवा राहील, हलके अन्न घ्या.

सिंह राशी | saam tv

कन्या

घरातील गोष्टींमुळे चिंता वाढू शकते. प्रॉपर्टी संबंधित कामात विलंब होईल, संयम आवश्यक आहे.

कन्या | Saam Tv

तुळ

रागावर नियंत्रण ठेवा, कठोर शब्द नात्यांना दुखावू शकतात. नवीन गुंतवणूक टाळा, आरोग्याची काळजी घ्या.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

घसा किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो, हवामानापासून जपा. भावनेत येऊन मोठा निर्णय घेऊ नका.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

नात्यात गैरसमज होऊ शकतात, संशय टाळा. ऑफिसमध्ये तुमच्या मताला महत्त्व मिळेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

खर्च वाढल्याने तणाव जाणवेल. उधार देणे टाळा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

रागावर नियंत्रण आवश्यक, पायाला दुखापत होऊ शकते. मोठे निर्णय पुढे ढकला, अभ्यासासाठी दिवस चांगला आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

डोकेदुखी किंवा डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो. खर्च कमी ठेवा आणि प्रेमसंबंधात संयम ठेवा.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

Chanakya Niti | google
येथे क्लिक करा