Primary Teacher Viral Video: 
व्हायरल न्यूज

Viral Video: वा रे वा 'गुरू'! भरवर्गातच शिक्षिकेने घेतली झोप; विद्यार्थिंनींना घालायला लावली हवा

Primary Teacher Viral Video: महिला शिक्षिका शाळेच्या प्राथमिक विभागातील होती. ही शिक्षिका शाळेच्या वेळेत वर्गात झोपत होती. ही लज्जास्पद घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील अलीगढमधील एक महिला शिक्षिकेचा वर्गातील व्हिडिओ व्हायरल झालाय. ड्युटीवर असतानाच ही शिक्षिका भरवर्गात झोपी गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सर्वात संतापजनक घटना म्हणजे या शिक्षिकेने विद्यार्थिनींना हवा घालयला लावली. ही महिला शिक्षिका प्राथमिक शाळेत शिकवते. ही शिक्षिका शाळेच्या वेळेत वर्गातच झोपी गेली. सोशल मीडियावर या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

हा व्हिडिओ अलीगढच्या धानीपूर ब्लॉकमधील गोकुलपूर गावातील प्राथमिक शाळेतील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, शिक्षिका वर्गात डुलकी घेत आहे आणि विद्यार्थी तिला कडक उन्हापासून आराम मिळवून देण्यासाठी हवा घालत आहेत. या घटनेने उत्तर प्रदेशातील शिक्षणाच्या व्यवस्थेचा पर्दाफाश झालाय. इंटरनेटवर व्हिडिओ समोर आल्यानंतर मुलांचे पालक संताप व्यक्त केलाय.

मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि काहीतरी शिकावे म्हणून शाळेत पाठवत असतो. मात्र शिक्षक त्यांच्याकडून वेगळेच काम करायला लावतात, अशा संतप्त भावना पालकांनी व्यक्त केल्या. शिक्षिकेच्या वागणुकीवरुन इंटरनेट युजर्स शिक्षिकेवर टीका करत आहेत. एका युजर्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, शिक्षकच असे असतील तर शाळा कशा चालतील.

महिला शिक्षिका निरागस मुलांना हवा घालायला लावते. ज्या शाळेत ही घटना घडली ती सरकारी शाळा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ एखाद्या आतल्या व्यक्तीने शूट केला असावा आणि सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह ज्या जिल्ह्यात राहतात त्याच जिल्ह्यातील एका शाळेचा हा व्हिडिओ आहे. या घटनेने मंत्री ज्या ठिकाणचे आहेत, तेथील सरकारी शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार? महत्त्वाची माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: सोना चांदीच्या भावात घट, गुंतवणूकदारांना दिलासा

Comedy Actor Death News : ज्येष्ठ विनोदी अभिनेत्रीचं ७१ व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

Kitchen Hacks : फ्रीज घाणेरडा आणि पिवळा पडलाय? 'या' टिप्स वापरून पुन्हा करा नव्यासारखा चकचकीत

SCROLL FOR NEXT