Viral Video : भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर मॅडम कजरारे गाण्यावर थिरकल्या; नेटकरी म्हणतायत आम्हाला पण अशाच शिक्षिका पाहिजे होत्या

Teacher Dance On Kajra re : विद्यार्थ्यांचा आग्रह पाहून मॅडम देखील खुश होतात आणि गाण्यावर नाचू लागतात. गाण्यावर नाचत असतानाचा त्यांचा व्हिडिओ अन्य काही मुलं आपल्या फोनमध्ये कैद करत आहेत.
Viral Video
Viral VideoSaam TV

शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा व्यक्ती असतो. आपल्या विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात पारंगत व्हावं यासाठी प्रत्येक शिक्षक काही ना काही धडपड करत असतो. अशात पूर्वीच्या काळी शिक्षक म्हटलं की अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती अशी भूमिका असायची. मात्र आता सर्व शिक्षक एक मित्र होऊन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आपल्याला पण अशाच मॅडम पाहिजेत.

Viral Video
Ranveer Singh Deepfake Video: रणवीर सिंगच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल करत तपास सुरू

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॉलेजमध्ये त्यांच्या एका शिक्षिकेचा वाढदिवस आहे. आपल्या मॅडम वाढदिवसाच्या दिवशी देखील सुट्टी न घेता कॉलेजला आल्यात हे पाहून विद्यार्थी मॅडमसाठी काही तरी करण्याचा प्लान करतात. ते वर्गात फळा छान सजवतात. केक आणि गिफ्ट घेऊन येतात. मॅडम वर्गात येताच त्यांना सरप्राइज देतात. मुलांनी केलेली तयारी पाहून या शिक्षेकेला देखील फार आनंद झाला आहे.

काही वेळाने मुलं पार्टी करण्याच्या मुडमध्ये येतात. पार्टीसाठी सुरुवातीला बॉलिूडमधील काजरारे हे गाणं प्ले करतात आणि मॅडमला या गाण्यावर नाचण्याचा आग्रह करतात. विद्यार्थ्यांचा आग्रह पाहून मॅडम देखील खुश होतात आणि गाण्यावर नाचू लागतात. गाण्यावर नाचत असतानाचा त्यांचा व्हिडिओ अन्य काही मुलं आपल्या फोनमध्ये कैद करत आहेत. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या शिक्षिकेने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच गाण्यावर नाचत असताना एक मुलगा त्यांच्या डोक्यावर लाल रंगाची ओढणी टाकतो. त्यावेळी शिक्षिका देखील ती ओढणी हातात घेऊन डान्स करतात. मॅडमचा डान्स व्हिडीओ @log.kya.kahenge या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत.

नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर भन्नाट कमेंट केल्यात. अशा मॅडम आमच्यावेळी का नव्हत्या अशी खंत काहींनी व्यक्त केली आहे. तर काहींनी या मॅडमच्या डान्स स्टेप्सचं कौतुक केलं आहे. कॉलेजमध्ये अशा एक तरी टीचर असतात ज्या सर्वांच्या फेवरेट असतात. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या शिक्षिका देखील येथे सर्व विद्यार्थ्यांच्या फेवरेट असाव्यात.

Viral Video
Viral Video: भररस्त्यात पार्क केला जेसिबी, ड्रायव्हरचा उर्मटपणा पाहून नेटकरी संतापले; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com