Wedding In ICU Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding In ICU: आजारी वडिलांचा हट्ट! थेट आयसीयू वॉर्डमध्ये पार पडला मुलींचा विवाह सोहळा; काळजाला भिडणारा VIDE0 व्हायरल

Lucknow Viral Video: सोशल मीडियावर आज एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात आजारी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्हीं मुलीचा विवाह सोहळा थेट आयसीयूमध्येच पार पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बाप- लेकीचं नातं कायम पावलोपावली काही वेगळंस दिसून आलं आहे. कोणत्याही नात्यांत नसेल अशी ओढ बाप-लेकीच्या नात्यांत असते. लहानपणापासून प्रत्येक वडील आपल्या मुलीला फुलाच्या पाकळीप्रमाणे जपतो. लेकीचं लग्न हे लग्न त्याच्या डोळ्यादेखत व्हावे असे त्याला वाटतं असते. अशातच सोशल मीडियावर वडील- मुलींच्या नात्यांच्या अनोखा क्षण दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात वडिलांची शेवटी इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही मुलीचे लग्न रुग्णालयातच पार पडले आहे.

सोशल मीडियावर दर क्षणाला लाखो व्हिडिओ शेअर केले जातात. जगभरातील अनेक व्हायरल व्हिडिओ कधी परिस्थितीची झळक दाखवणारे असतात तर कधी आयुष्यातील मोजके प्रसंग दाखवणारे असतात. याच व्हिडिओमध्ये अनेकदा कुटुंबातील अनेक नात्यांचे भावनिक(emotional) व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात सर्वात जास्त व्हायरल होणारे व्हिडिओ हे बाप-लेकींचे असतात. सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या बाप-लेकीचा व्हिडिओ प्रत्येक नेटकऱ्यांच्या मनाला पसंत येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लखनौमधील आहे. लखनौमध्ये (Lucknow)वास्तव्यास असलेले ५१ वर्षीय मोहम्मद इक्बाल हे काही दिवसांपासून आयसीयूमध्ये आहेत. मोहम्मद यांना दोन मुलीही आहेत. मोहम्मद यांची प्रकृती काही दिवस झाले खालवत चालली आहे. त्यामुळे आपल्या लेंकीचे लग्न त्याच्यां डोळ्यादेखत व्हावे अशी इच्छा आहे. मोहम्मद यांच्या मुलीच्या लग्नाची तारीखही ठरलेली आहे मात्र आयसीयूमध्ये असल्याने मुलींचे लग्न होणे काही शक्य नव्हते.

मोहम्मद यांनी दोन्ही मुलींचे लग्न(Weeding) रुग्णालयातील आयसीयूमध्ये व्हावी अशी अट रुग्णालय प्रशासनास आणि त्यांच्या मुलींना घातली. मोहम्मद यांच्या या व्यक्तव्याला रुग्णालय प्रशासनाने होकारही दिला. मोहम्मद यांच्या इच्छेखातीर मुलींनीही रुग्णालय प्रशासनाकडे आयसीयूमध्ये लग्न करण्याची परवानगी मागितली. मग काही वेळातच मोहम्मद यांच्यासमोरच दोन्ही लेकींचे लग्न पार पडले मात्र त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. सध्या या अनोख्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT