Viral Video: परिस्थिती गंभीर पण माऊली खंबीर! हातात तान्ह्या बाळाला घेवून चालवतेय रिक्षा; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक...

Woman Driving e-rickshaw Video Viral: तिच्या कष्टाला सलाम म्हणत... नेटकऱ्यांनी या माऊलीचे कौतुक केले आहे.
Viral Video
Viral VideoSaamtv
Published On

Viral Video News: आयुष्यात लढायला, घडायला शिकवणाऱ्या, संस्काराची शिदोरी देणारी सर्वात महत्वांची व्यक्ती म्हणजे आई. आई आणि वडिल आपल्या मुलांसाठी नेहमीच झटत असतात. मुलाच्या भविष्यासाठी, आरोग्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या लेकरांसाठी रात्रंदिवस झटणारी ती आई असते.

सध्या अशाच एका आईचा अन् तिच्या संघर्षाचा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. तिच्या कष्टाला सलाम म्हणत... नेटकऱ्यांनी या माऊलीचे कौतुक केले आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडिओ चला जाणून घेवू...

Viral Video
McDonald's Burger News : बर्गर होणार बेचव? मॅकडोनल्डने बर्गरमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय, हे आहे कारण

काय आहे व्हिडिओ...

परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटणारी आईचं असते. म्हणूनच आईच्या प्रेमाची तुलना दुसऱ्या कोणाच्याच प्रेमाशी होऊ शकत नाही. परिस्थितीविरुद्ध जिद्दीने संघर्ष करत आपल्या मुलांना मायेचा घास भरवणारे आई वडिलच असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांना भावूक केले आहे.

ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाला घेवून ई- रिक्षा चालवताना दिसत आहे. या माऊलीचे बाळ लहान असल्याने ती त्याला एकट्याला ठेवू शकत नाही. आणि बाळाला सांभाळत ती महिला घरीही बसू शकत नाही. त्यामुळे ती त्या लहान मुलाला सोबत घेवून रिक्षावर भाडे मारताना दिसत आहे. (Viral Video News)

Viral Video
Amravati News : गद्दारांना श्रद्धांजलीचे लागले फलक; अमरावती शहरात चर्चेचा विषय

एका हातात रिक्षाच हँडल आणि एका हातात आपल्या तान्ह्या लेकराला घेवून ही महिला परिस्थितीवर जिद्दीने मात करताना दिसत आहे. तिच्या या धाडसाचे आणि संघर्षाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत असून या माऊलीला अनेकांनी देवीचा दर्जा दिला आहे. तसेच काही जणांनी तिला सरकारकडून मदत मिळायला हवी.. अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com