Two Elderly Persons Fight is ST Bus
Viral VideoSaam Tv

Viral Video : एसटीबसमध्ये दोन आजोबा एकमेकांना भिडले; हातात बुट घेत बेदम कुटाकुटी, VIDEO व्हायरल

Two Elderly Persons Fight is ST Bus : बसमध्ये बसण्यासाठी जागा नाहीये. जागा नसल्याने दोघेही ड्रयव्हर शेजारी असलेल्या जागेवर उभे आहेत. रस्त्याला खड्डे असल्याने दोघांचा एकमेकांना धक्का लागतो.
Published on

आजवर एसटी बसमध्ये महिलांची हाणामारी चांगलीच गाजली आहे. सिटसाठी, उभे असताना विविध कारणांसाठी महिला एसटीबसमध्ये भांडताना दिसतात. त्यांचे आजवर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. अशात आता थेट दोन ज्येष्ठ आजोबा एसटी बसमध्ये एकमेकांशी भिडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Two Elderly Persons Fight is ST Bus
Viral VIdeo: एलियन्स खूप आधीपासूनच पृथ्वीवर फिरतायत? वेगवेगळ्या रुपात एलियन्सचं वास्तव्य? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली आहे. सिल्लोड आगाराची बस हट्टी येथे जात असतांना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चांदापूर गावालगत दोन जेष्ठ नागरिक यामध्ये प्रवास करत होते. यातील एक आजोबा एसटीने मोफत प्रवास करत होते, तर दुसऱ्या आजोबांना आर्धे भाडे होते. या दोघांमध्ये बसमध्ये असतानाच अचानक हाणामारी सुरू झाली.

विशेष म्हणजे चालकाच्या बाजूला असलेल्या बोनेटवर एक जण बसलेला होता. त्यांच्या हाणामारीमुळे चालकाचे बसवरील लक्ष विचलित होऊ लागल्याने चालक इब्राहिम पठाण यांनी बस अवघड वळण रस्त्यावर थांबवून त्यांचे भांडण सोडवले. केवळ धक्का लागल्यामुळे झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बसमध्ये बसण्यासाठी जागा नाहीये. जागा नसल्याने दोघेही ड्रयव्हर शेजारी असलेल्या जागेवर उभे आहेत. रस्त्याला खड्डे असल्याने दोघांचा एकमेकांना धक्का लागतो. धक्का लागल्याने पुढे दोघांमध्ये बाचाबाची होते. नतंर हे भांडण इतकं वाढतं की दोघांनाही त्यांच्या वयाचं भान राहत नाही.

दोघेही थेट हातत बुट घेतात आणि एकमेकांवर हल्ला करतात. राग फार वाईट असतो असं म्हणतात. रागाच्या भरात व्यक्ती काय करेल आणि काय नाही याचाही काही नेम नसतो. धक्का लागल्याचा जास्त राग आल्यानेच या दोघांमध्ये वाद झाला आहे.

Two Elderly Persons Fight is ST Bus
Italy Parliament Fight Video: लाथाबुक्यांनी तुफान हाणामारी; संसदेचे 'आखाड्या'त रूपांतर, इटलीत खासदारांमध्ये जोरदार राडा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com