इटालियन खासदारांनी संसदेत एकमेकांना लाथाबुक्यांनी हाणामारी केल्याची घटना घडली आहे. जी-७ शिखर परिषदेसाठी इटली जागतिक नेत्यांचे स्वागत करण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. प्रदेशांना अधिक स्वायत्तता देण्याच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या योजनेवरून हा वाद सुरू झाला. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या हवाल्यानुसार, जी ७ शिखर परिषदेच्या एक दिवस आधी ही घटना घडली आहे.
संसदेमध्ये जवळपास २० लोक एकमेकांना हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या हातात इटलीचा ध्वज असल्याचं पाहायला मिळत आहे. या हाणामारीत काही खासदार जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही सेकंदामध्येच इटालियन संसदेचं आखाड्यात रूपांतर झाल्याचं दिसत आहे. इटलीतील खासदारांमधील हा राडा सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होत (Italy Parliament Fight Video) आहे.
इटलीने १३ ते १५ जून दरम्यान जी- ७ परिषदेचे आयोजन केले आहे. हा गोंधळ १२ जूनच्या संध्याकाळी झाला (Italian Parliament) आहे. फाइव्ह स्टार मूव्हमेंट (M5S) डेप्युटी लिओनार्डो डोनो आणि स्वायत्तता समर्थक नॉर्दर्न लीगचे प्रादेशिक व्यवहार मंत्री रॉबर्टो कॅल्डेरोली यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. लिओनार्डोने रॉबर्टो यांच्या गळ्यात इटालियन ध्वज बांधण्याचा प्रयत्न (Italian Parliament MPs Clashes) केला. डोनोच्या स्टंटचा उद्देश रोमच्या त्या प्रदेशांना अधिक स्वायत्तता देण्याच्या योजनेचा निषेध करणे हा होता. परंतु अनेक समीक्षकांनी हे पाऊल इटलीची एकता कमकुवत करू शकते, असं सांगितलं आहे.
या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पुन्हा पुन्हा शेअर केला जात आहे. या वादामुळे राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रियांचा पूर आला. इटलीतील पार्लिमेंट हाऊस 'बॉक्सिंग रिंग' मध्ये बदललं (Fight Video) आहे. लीग आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाचे खासदार ब्रदर्स ऑफ इटली यांनी डोनोवर या घटनेला चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.