Fighting Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Student Fighting Viral Video: लखनऊ येथील अॅमिटी युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आहे. एका विद्यार्थ्याला २६ वेळा कानाखाली मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे.

Manasvi Choudhary

उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आहे. अॅमिटी विद्यापीठातील या विद्यार्थ्यांनी त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाला बेदम मारलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी दीड मिनिटांत या मुलाला २६ वेळा कानाखाली मारल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाला का मारलं आहे याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

लखनऊ येथील अॅमिटी युनिव्हर्सिटी हा प्रकार घडला आहे. कॉलेज कॅम्पस पार्किंगमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आहे. तीन ते चार विद्यार्थ्यांनी मिळून एका तरूणाला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये एक मुलगी देखील आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन - चार विद्यार्थ्यांचा ग्रुप मिळून त्या मुलाला धमकावत आहे मारत आहेत.

अॅमिटी युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाला हे सर्व विद्यार्थी शिकत आहे. कॉलेज सुटल्यानंतर कॅम्पसमध्ये कारमध्ये हे विद्यार्थी थांबले आहेत. यावेळी त्याच्यात बाचाबाची झाली. एका मुलीने त्याला जाब विचारला असता मुलाने उत्तर देण्यास नकार दिला आहे. यानंतर या मुलीने त्याला कानाखाली मारली आहे.

याचदरम्यान हा मुलगा मार टाळण्यासाठी त्याच्या गालावर हात ठेवतो तेव्हा ही मुलगी त्याला धमकी देताना दिसते आहे ती त्याला हात खाली कर असं म्हणते आहे. मुलगा गालावरचा हात हटवत नाही हे समजताच ती मुलगी त्याच्या कानशिलात मारते. दरम्यान अजून एक मुलगा त्याला मारत आहे. ज्या मुलाला मारलं आहे त्याचं नाव शिखर केसरवानी आहे. शिखर हा त्याचाच मित्र आहे. एकाच वर्षाला हे सर्वजण शिकत आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेवर मंगळवारी १२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या वेळेत बदल

High Blood Pressure Diet Tips: तुम्हालाही हाय बीपीचा त्रास आहे? मग काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT