Fight Video Viral: खेळण्यावरून वाद, वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थ्यांचा राडा; ३ ते ४ जणांकडून एकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

Fight Video Viral: गुजरातच्या जुनागढमध्ये वसतिगृहात विद्यार्थ्यांचा राडा झाला. ३ ते ४ विद्यार्थ्यांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.
Fight Video Viral
Fight Video ViralSaam Tv
Published On

गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहामध्ये एका तरूणाला बेदम मारहाण केली. तीन ते चार तरूणांनी मिळून एका तरूणाला मारलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांना या घटनेची माहिती झाली. व्हिडीओ पाहताच तरुणाच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.

Fight Video Viral
Viral Video: ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या तरुणांनी बाईक उचलली अन्...; सगळे पाहतच राहिले, पाहा VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जुनागढ येथे ही घटना घडली. अल्फा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असलेले विद्यार्थी एका वसतिगृहात राहत होते. ११ वी, १२ वीच्या वर्गात हे तरूण शिकत आहेत. वसतिगृहातील त्यांच्या रुममध्ये ते खेळत बसले होते. खेळ सुरू असताना या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. सुरूवातीला शा‍ब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की तीन ते चार तरुणांनी मिळून एका विद्यार्थ्यांला बेदम मारहाण केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे कुटुंबियांना ही घटना समजली. यानंतर कुटुंबियांनी वसतिगृह आणि कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरत पोलिसात तक्रार दाखल केली. कुटुबियांनी वसतिगृह आणि शाळा प्रशासनाकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अल्फा इंटरनॅशनल स्कूलने स्पष्ट केले की, ही घटना शाळेच्या जागेवर नाही तर खासगी वसतिगृहात घडली. याची जबाबदारी पूर्णपणे वसतिगृह मालकाची आहे. त्यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करत त्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घटनेची माहिती पोलिसांना आणि कुटुंबियांना देण्यात आली आहे.

Fight Video Viral
Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com