Viral Dog Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: माणुसकी कुठे मेली, ट्रेनमध्ये कुत्र्याला बांधलं अन् मालक फरार झाला, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Viral Dog Video: बिहारच्या रक्सौल स्टेशनवर ट्रेनच्या सीटला कुत्रा बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मालक फरार, प्रवासी घाबरले, ट्रेन उशीरा सुटली. सोशल मीडियावर संतापाचा भडका उडाला आहे.

Manasvi Choudhary

सध्या सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये श्वानाला सीटला बांधून ठेवण्यात आलं आहे. प्रवाशांच्या या ट्रेनमध्ये सीटला श्वान बांधून ठेवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ट्रेन जवळपास एक तास उशीरा सोडण्यात आली. सर्वत्रच गोंधळ उडाला. प्रवांशानी तात्काळ श्वानाचा व्हिडीओ काढत रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली आहे.

बिहारच्या रक्सौल रेल्वेस्थानकात ही घटना घडली आहे. समस्तीपूरला जाणाऱ्या ट्रेनच्या सीटला एका पांढऱ्या श्वानाला साखळीने बांधून ठेवले आहे. बराच वेळ श्वान भुंकत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे प्रवासी देखील ट्रेनमध्ये चढण्यास घाबरले आहे. कोणी वाचवेल का, यासाठी तडफडलेला, घाबरलेला श्वान हल्ला करण्याचा प्रयत्नात असल्याची भिती प्रवाशांना आहे. यामुळे प्रवांशामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बराच वेळ सीटला श्वान बांधून ठेवल्यामुळे कोणी मालक येत नसल्याने प्रवाशांच्या लक्षात आले. कदाचित मालक त्याला ट्रेनमध्ये सोडून गेला आहे. यामुळे सोशल मीडियावर ही घटना सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

रेल्वेतून प्रवास करताना रेल्वे प्रशासनाचे काही नियम आहे. मात्र अनेकदा प्रवासी या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. रेल्वेतून प्राण्यांना नेण्यास मनाई असताना देखील असा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर प्रवाशांच्या श्वानाच्या सुरक्षेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तो डबा पूर्ण रिकामा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

SCROLL FOR NEXT