Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: सेल्फीच्या नादात मुलगी पडली धबधब्यात, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

चीनमध्ये धबधब्याजवळ सेल्फी काढताना मुलगी पाण्यात पडली. पालकांच्या निष्काळजीपणामुळे झालेला हा प्रकार थोडक्यात टळला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Published on

डोंगराळ भागात किंवा धब्याधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह सर्वानाच असतो. मात्र असे काही करताना अनेकदा जीव देखील धोक्यात जाण्याची शक्यता असते. नुकतंच धबधब्याच्या शेजारी आई- वडिलांच्या निष्काळजीपणामुळे एक मुलगी वाहत्या पाण्यात पडली आहे. मुलगी थोडक्यात वाचली आहे. मात्र तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

चीनमधील गुईझोऊ प्रांतातील एका धबधब्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कुटुंबाच्या चुकीमुळे मुलगी थेट वाहत्या पाण्यात पडली आहे. फोटो काढण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब पोज देत होते. दरम्यान छोट्या मुलीला धक्का लागतो अन् ती पाण्यात पडते. आई वडिलांना समजताच ते देखील कासावीस होतात. मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मुलीने एका दगडाला पकडून ठेवल्याने तीचा जीव वाचला आहे. अन्यथा पाण्याच्या वाढत्या प्रवाहात वाहून जाऊन गंभीर दुर्घटना घडली असती.

पाण्याच्या ठिकाणी बाहेर फिरायला गेल्यानंतर आई- वडिलांनी मुलांची काळजी घेणे महत्वाचे आहे. फोटो, सेल्फीच्या नादात अनेकदा आई- वडिलांचे लक्ष मुलांकडे नसते यामुळे मोठा धोका पत्करतो. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने युजरने कमेंट करत, 'अशा ठिकाणी भेट दिल्यावर मुलांचे फोटो सुरक्षित ठिकाणी काढले पाहिजे, मी मुलांना अशा ठिकाणी कधीही घेऊन जाणार नाही.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'आजच्या काळात लोकांना अशा पद्धतीने फोटो घेण्याची खूप वाईट सवय आहे.'

Viral Video
Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com