Viral Video: दुचाकी पार्किंगवरून पेटला वाद, तरूण आणि पोलिसांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

नरसिंहपूरच्या करेली शहरात नो पार्किंगवरून दुकानदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. दुकानदार तरुणाने पोलिसांना मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एका दुकानदार तरूण आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावारून तरूणाने पोलिसांशी हुज्जत घालत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video
Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

मध्यप्रदेशातील नरसिंहपूरच्या करेली शहरात ही घटना घडली आहे. माहितीनुसार, येथील स्थानिक दुकानदार दीपांशू यादव याने त्याची दुचाकी बँकेबाहेर उभी केली होती. नो पार्किंग झोनसमोर दुचाकी लावल्याने पोलिसांनी ती हलवलण्याचा प्रयत्न केला. तरूणाने बघताच दुचाकी नेण्यास विरोध केला याचवेळी तरूणाने पोलिसांना मारहाण करण्यास सुरूवात केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलिस आणि दुकानदार तरूण यांच्यात हाणामारी सुरू आहे. दुचाकी नेण्यावरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहचला आहे. पोलिसांवर मारहाण करणाऱ्या या तरूणाला तीन ते चार पोलिसांनीच मिळवून चांगला धडा शिकवला आहे.

सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे पोलिस रक्षण करतात त्याच पोलिसांना मारहाण होत असेल तर कसं होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Viral Video
Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com