Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईत रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर हिंदी बोलण्याची सक्ती, कर्मचाऱ्याची प्रवाशावर दादागिरी; VIDEO

Shocking Video: मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचाऱ्याने अमोल माने या प्रवाशांवर केल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे

Tanvi Pol

Nahur News: सोशल मीडियावर सध्या नाहूर रेल्वे स्थानकातील घटलेल्या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे मुंबईत परत एकदा मराठी न बोलण्यावरुन नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचारी आणि प्रवाशामध्ये वाद झाले आहेत. सध्या या घटनेने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. नक्की संपूर्ण प्रकरण कधी आणि कसे घडले ते तुम्ही पाहा.

नेमके प्रकरण काय?

अमोल माने यांनी नाहूर स्थानकात(Station) लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोलावे असे अमोल माने यांना सांगितले मात्र मराठीतच बोलणार असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ(Video) माने यांनी मोबाईल मध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यानतंर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.

व्हायरल होत असलेली घटना युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या दिसून येत असून याचा व्हिडिओ युट्युब-वरील ''saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सध्या या व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर मोठ्या संख्येने नेटकरी या व्हिडिओला अन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT