लग्न हा जीवनाचा असा टप्पा असतो जो प्रत्येकाला अविस्मरणीय बनवायचा असतो.आपलं लग्न सगळ्यांपेक्षा वेगळं असावं, असा विचार करून प्रत्येक जोडपं नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतं.असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधून समोर आला आहे. येथे दोन भावांचे एकाच दिवशी लग्न होते. दोघेही त्यांच्या लग्नामुळे इतके खूश होते की त्यांनी 20 लाख रुपये हवेतच खर्च केले.
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही खरचं धक्का बसेल. लग्नाची मिरवणूक घरातून निघणार असतानाच नवरदेव गच्चीवर चढला. यासोबतच घरातील इतर सदस्यही गच्चीवर आले. त्यानंतर त्यांनी 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल उडवण्यास सुरुवात केली. कुटुंबातील काही सदस्यांनी तर जेसीबीवर चढून चलनी नोटांचे बंडल फेकून दिले. काही वेळातच नोटा लुटण्यासाठी जमाव जमला. लोक उड्या मारून नोटा पकडू लागले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा विवाह संपूर्ण सिद्धार्थनगरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कारण लग्नाच्या मिरवणुकीत छतावर आणि जेसीबीवर चढून नोटा उडवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन वर आणि त्यांचे कुटुंबीय 100 ते 500 रुपयांच्या नोटा कागदाप्रमाणे हवेत उडवताना दिसत आहेत. त्याचवेळी खाली उपस्थित असलेले लोक हवेत उडणाऱ्या नोटा लुटताना दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल झालेला व्हिडिओ देवलहवा गावातील रहिवासी अफजल आणि अरमान यांच्या लग्नाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील दोन्ही मुलांची लग्ने होणार होती. यावेळी, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वी दोन्ही वर गच्चीवर पोहोचले आणि त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही टेरेसवर आले. त्यानंतर सर्वांनी मिळून 20 लाख रुपये खर्च केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेक युजर्स शेअर करत आहेत.ते याला शाही लग्न देखील म्हणत आहेत. एका युजरने लिहिले - एवढ्या पैशात किती लग्न होतील कोणास ठाऊक तर दुसऱ्याने लिहिले - अंबानी कुटुंबाला स्पर्धेचा सामना करावा लागतोय. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- अप्रतिम! पण पैशाचा अपव्यय.
Edited By- नितीश गाडगे
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.