Crocodile Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Crocodile Viral Video: अरे बापरे! कोकणातील रस्त्यावर अचानक चालायला लागली मगर; VIDEO पाहून उडतील तुमचेही होश

Crocodile On Street Viral Video: चिपळूणमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे आता मगर रस्त्यावर वावरत आहे. याच मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

मगर ही महाकाय प्राणी आहे. मगरीला सर्वजण घाबरतात. मगर आतापर्यंत आपण फक्त पिंजऱ्यात किंवा पाण्यात पाहिली असेल परंतु मगर आता रस्त्यावर चालायला लागली तर? मगरीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिपळूणच्या रस्त्यावर खुलेआम मगरीचा वावर दिसत आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चिपळूणच्या चिंचनाका परिसरात ही मगर रस्त्यावर चालताना दिसली. गेल्या ४ दिवसांपासून चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीपात्रातून ही मगर बाहेर आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चालत असलेल्या या मगरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत ही मगर रस्त्याच्या मधून फिरताना दिसत आहे. ही मगर रस्त्यावरुन जात असलेल्या वाहनांच्या मधून वाट काढताना दिसत आहे. भलीमोठी मगर रस्त्यावर खुलेआम वावरत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मगरीचा हा व्हिडिओ रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारचालकाने रेकॉर्ड केला आहे.महाकाय मगर अचानक रस्त्यावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिनाभरापूर्वीच ही मगर एकदा रस्त्यावर दिसली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मगर रस्त्यावर दिसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT