Juggad Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चक्क तंबाखूच्या पाकीटातून गाडीत भरलं पेट्रोल, पठ्ठ्याचा अनोखा जुगाड पाहिलात का?

Jugaad viral Video: सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. पेट्रोल- डिझेलचे भाव काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे अनेकदा काहीजण जुगाड करुन पेट्रोल वाचवण्यासाठी अनेक जुगाड करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. पेट्रोल- डिझेलचे भाव काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे अनेकदा काहीजण जुगाड करुन पेट्रोल वाचवण्यासाठी अनेक जुगाड करतात. काहीजण जुगाड करुन इलेक्ट्रिक स्कूटी तयार करतात. तर काहीजण दुसऱ्याच्या वाहनातील पेट्रोल स्वतः च्या वाहनात भरतात. असाच एक जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती दुसऱ्याच्या वाहनातील पेट्रोल काढून स्वतः च्या बाईकमध्ये भरताना दिसत आहे. त्याची पेट्रोल भरण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे. हा व्यक्ती कोणत्या बाटलीने किंवा ग्लासाने पेट्रोल काढत नसून चक्क तंबाखूच्या पाकिटातून पेट्रोल काढताना दिसत आहे. हेच पेट्रोल तो आपल्या स्वतः च्या स्कूटीमध्ये भरताना दिसत आहे. वेळप्रसंगी कोणतीही बाटली नसताना त्याने हा जुगाड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ SonuMdevi या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. याव व्हिडिओवर हे टॅलेंट राजस्थानच्या बाहेर जाऊ देऊ नका, असं कॅप्शन देण्यात आले आहे. यावरुन हा व्हिडिओ राजस्थानचा असल्याचे समजत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पेट्रोलचे भाव कमीच होत नाही, तो तरी बिचारा काय करणार?, हा जुगाड खूप भारी आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad election date : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट, वाचा नेमका कधी उडणार धुरळा

Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला! विदर्भातील किमान तापमान सर्वाधिक कमी; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा सुजात आंबेडकरांची टीका

Petrol Diesel Price: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरणार; वाचा सविस्तर

Remove lint balls sweaters: स्वेटरवरचे गोळे कसे काढायचे? घरगुती सोपे उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT