Driver Bath in Running Truck
Viral VideoSaam TV

Viral Video : हाय गरमी! रखरखत्या उन्हात ट्रक चालकाचा अनोखा जुगाड; धावत्या वाहनात केली अंघोळ

Driver Bath in Running Truck : ट्रक चालकाने गरमीपासून उन्हापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून थेट ट्रकमध्येच अंघोळ केली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने ट्रक रस्त्यावर चालवत असताना अंघोळ घेतली आहे.
Published on

राज्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. उन्हामुळे जीवाची लाहीलाही होतेय. अनेकांना तर उष्माघाताने मृत्यू देखील ओढवत आहे. त्यामुळे स्वत:चं शरीर थंड ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत आहे. अशात सोशल मीडियावर एका ट्रक चकालाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Driver Bath in Running Truck
Parbhani News: वाळू माफियांची दहशत! अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पळवला टिप्पर; भररस्त्यात सिनेस्टाईल थरार| VIDEO

या ट्रक चालकाने गरमीपासून उन्हापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून थेट ट्रकमध्येच अंघोळ केली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने ट्रक रस्त्यावर धावत असताना अंघोळ घेतली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रकचालक वाहन चालवत आहे. त्यात त्याने शेजारी असलेल्या सीटवर एक बकेट ठेवलीय.

या बकेटमध्ये पाणी आणि एक मग ठेवला आहे. ट्रक चालवत असताना हा व्यक्ती गरम जाणवू लागल्यावर अंगावर पाणी ओतून घेत आहे. @shaikshavalibasha या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील अनेक कमेंट केल्यात.

धावत्या ट्रकमध्ये असा स्टंट करणे म्हणजे जीवाशी खेळ आहे, असं काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर काहींनी या व्यक्तीवर हसण्याचे ईमोजी शेअर केलेत. राज्यात सर्वत्र ऊन फार वाढले आहे. अशात वाहन चालकांना घरात बसून जमत नाही. घरात बसून राहिल्यास त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही.

पैशांसाठी रोजगारासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागते. कार असल्यास त्यात एसी असतो. त्यामुळे ऊन फार जाणवत नाही. मात्र ट्रक, टेम्पो अशी अवजड वाहने चालवणाऱ्या व्यक्तींना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भोवळ येण्याची शक्यता असते. परिणामी अपघात देखील होतात.

Driver Bath in Running Truck
Truck Driver Strike: पोलीस बंदोबस्तात इंधन भरून टँकर रवाना; अनेक चालकांचा संपात सहभाग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com