पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

‘Enemy’s Enemy Is a Friend’: ठाकरेसेनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी नवा डाव टाकलाय. दुष्मन का दुष्मन दोस्त या रणनीतीनं एकेकाळचा शिवसेनेचा आणि आता शिंदेंचा कट्टर विरोधक असलेल्या नेत्याशी हातमिळवणी केलीय. काय आहे ही रणनीती? कोण आहे कट्टर विरोधक ? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.....
THANE POLITICS HEATS UP AFTER PURNEKAR
THANE POLITICS HEATS UP AFTER PURNEKARsaam tv
Published On: 

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर आता ठाकरेसेनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी तयारी सुरू केलीय. दुष्मन का दुष्मन दोस्त असा डावपेच खेळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

शिंदेंचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे मंत्री गणेश नाईकांना ठाण्याचे पालकमंत्री व्हा आणि शिंदेंची गुंडगिरी मोडून काढा असं आवाहन करत खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय. विशेष म्हणजे राऊतांनी ठाण्यातल्या गुंडगिरीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना जबाबदार धरलंय़.

मात्र ठाकरेसेना पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी पूर्णेकर प्रकरणाचा राजकीय वापर करतंय असा आरोप शिंदेसेनेच्या मीनाक्षी शिंदेंनी केलाय..

दुसरीकडे राऊतांनी शाहांवर केलेल्या टीकेनंतर तुमच्या पक्षात असले की साधुसंत आणि एकनाथ शिंदेसोबत गेले की गुंड कसे? असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय... तर निवडणुकीतील पराभवानंतर सर्व प्रकरणाचं खापर शिंदेंवर फोडलं जात असल्याचा आरोप शिंदेसेनेच्या नरेश म्हस्केंनी केलाय...

एकंदरीतच, पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकारण एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं आहे. हत्येच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंना घेरण्याची रणनीती ठाकरेसेनेकडून आखली जातेय, तर सत्तेतील शिंदेंच्या विरोधकांना पुढे करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. आता या राजकीय चिखलफेकीत पूर्णेकरांना खरोखर न्याय मिळणार की हे प्रकरण केवळ राजकीय कुरघोडीपुरतंच मर्यादित राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com