Viral Video x
व्हायरल न्यूज

Viral : ओ चाचा.. मूत्रालय नाही, मंत्रालय लिहिलंय; मंत्रालयाच्या भिंतीवर लघुशंका करणाऱ्या काकांचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंत्रालयाच्या भिंतीवर लघुशंका करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

भारतात गावांमध्ये शौचालयाशी संबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात. प्रशासनाने विविध योजना राबवून देखील बरेचसे लोक शौचालयाच्या ऐवजी शेतात, रानात शौच करण्यासाठी जातात. फक्त गावातच नाही शहरांमध्येही अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. सार्वजनिक शौचालय असतानाही काहीजण रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत लघुशंका करतात. यामुळे अस्वच्छता पसरते. अशा घाणेरड्या गोष्टी शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंत्रालयाच्या भिंतीवर लघुशंका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'काहीच सिविक सेन्स नाहीये आणि मग हेच लोक सरकारला दोष देतात' असे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पांढरी पँन्ट आणि पांढरा शर्ट परिधान केलेला वयस्कर व्यक्ती फुटपाथवर लघुशंका करत असल्याचे पाहायला मिळते. ही व्यक्ती ज्या भिंतीवर लघुशंका करत आहे, त्या भिंतीवर 'पृथ्वी विज्ञान मंत्रालय' असे मोठ्या अक्षरांमध्ये लिहिल्याचेही दिसते. हा व्हिडीओ दिल्लीतली लोदी रोडजवळचा आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कारमध्ये बसलेल्या कारचालकाने या व्यक्तीचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओमध्ये कारचालक त्या व्यक्तीला उद्देशून 'अरे चाचा, तेथे मूत्रालय नाहीतर मंत्रालय लिहिले आहे' असे म्हणतो. फक्त ६ सेकंदांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT