New Parle G Biscuit Packet Saam Digital
व्हायरल न्यूज

Parle G Girl Replaced: पार्ले गर्ल झाली गायब...पार्ले बिस्किटच्या पॅकेटला मिळालाय नवीन चेहरा; पहा VIDEO

New Parle G Biscuit Packet: प्रत्येक व्यक्तीच्या बालपणाच्या बऱ्याच खास आठवणी असतात. या आठवणीत काही गोष्टी अशा असतात की त्या कधी विसरणे शक्य नसते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parle G Girl Face Replaced Viral Post

प्रत्येक व्यक्तीच्या बालपणाच्या बऱ्याच खास आठवणी असतात. या आठवणीत काही गोष्टी अशा असतात की त्या कधी विसरणे शक्य नसते. तशीच एक गोष्ट म्हणजे आपण आणि आपले आई-वडील त्यांच्या लहानपणापासून खात आलेले'Parle-G'बिस्किट.

जेवढे पार्ले बिस्कीट फेमस आहे तेवढेच पार्ले बिस्कीटवरची पार्ले गर्लही. पार्ले गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या मुलीचा फोटो आता बिस्किटच्या पॅकेटमधून गायब झाला आहे. त्या जागी एका नवीन तरुणाचा फोटो पार्ले बिस्किटच्या पॅकेटवर आलाय. व्हायरल पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतेय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत पोस्टमध्ये आपल्याला दिसते की, चक्क पार्ले गर्लच्या जागी आपल्याला एका तरुणाचा फोटो दिसत आहे तर पार्ले जी बिस्किटच्या नावाच्या जागी Bunshah-G असे आहे. व्हायरल पोस्ट पार्ले कंपनीने स्वतः पार्ले जी @officialparleg या आपल्या अधिकृत इस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

पोस्ट व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तसेच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की,'आता मला बिस्किटे खाण्यात मजा येणार नाही' तर आणखी एका यूजरने लिहिलेय की,' या एका पोस्टने माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला'. पोस्टला एका दिवसात हजारो नेटकऱ्यांच्या लाईक्स मिळाल्या असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

नक्की काय प्रकरण आहे ते पाहूयात...

मिळालेल्या माहितीनुसार, पार्ले बिस्किटच्या पाकिटवर ज्या तरुणाचा फोटो आहे तो इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर जेरव्हा जे बंशाह आहे. तो इन्स्टाग्रामवर अनेक कॉमेडी व्हिडिओ बनवत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्याने विचारले होते की, जेव्हा तुम्ही पार्ले जी बिस्किट कंपनीच्या मालकाला भेटाल तेव्हा तुम्ही त्याला काय बोलावाल? पार्ले सर, मिस्टर पार्ले की पार्ले जी? यावर पार्ले जी कंपनीने उत्तर म्हणून त्याच्या फोटो पार्ले गर्लच्या जागी लावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

SCROLL FOR NEXT