Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह रे पठ्ठ्या! प्रेमासाठी काय पण; गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी थेट चढला दादर स्टेशनवरील टॉयलेटच्या छतावर; PHOTO होतोय व्हायरल

Viral News: प्रेमात लोक काहीही करतात, असं अनेकजण म्हणतात. प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात. असच एका मुलाने गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी चक्क दादर स्टेशनवर चढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. लोक सोशल मीडियावर लग्नाचे, डान्सचे, गाण्याचे आणि प्रेमाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. प्रेमासाठी लोक काहीही करु शकतात हे तर सर्वांना माहित आहे. प्रेमासाठी, गर्लफ्रेंडसोबत बोलण्यासाठी तरुण काहीह करतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तरुण गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी चक्क प्लॅटफॉर्मच्या शौचालयावर जाऊन बसला आहे. या मुलाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटो हा दादर स्टेशनवरील असलेला दिसत आहे. दादर स्टेशनवरील एका शौचालयाच्या वर चढून तो फोनवर बोलताना दिसत आहे. एवढी मेहनत फक्त गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी करत असेल, असा अंदाज नेटकऱ्यांना लावला आहे. हा व्यक्ती फोनवर बोलत आहे. त्याचसोबत त्याने तिथे आपला स्मार्टफोन चार्जिंगलादेखील लावला आहे. फोन चार्जिंगला लावून तो कॉलवर बोलताना दिसत आहे. हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा गोष्टी करणे टाळावे. या फोटोवर एवढी काय इमरजन्सी असेल बरं, असं या फोटोवर लिहण्यात आलं आहे. या तरुणाचा मजेशीर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

marathi.viral या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केला आहे. तो त्याच्या सोना- बाबूशी बोलत असेल, सोना- बाबूशी बोलण्यासाठी जीवाला धोका, मुलीची भानगड अजून काय अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT