Manasvi Choudhary
आजकाल लग्नसमारंभ, संगीत, रिसेप्शन, कॉकटेल पार्टी किंवा कॉलेज फेअरवेलला तरूणी खास साडी नेसतात. तरूणींच्या साडीची फॅशन थोडी हटके आणि वेगळी असते.
तरूणींमध्ये मॉडर्न साड्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. पारंपारिक साड्यांपेक्षा या साड्या वजनाला हलक्या, नेसायला सोप्या आणि अत्यंत फॅशनेबल असतात.
मॉडर्न साड्यांचे लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न्स कोणते आहेत ते पाहूया.
क्रेप साडी सॉफ्ट कापडासाठी ओळखली जाते. ही साडी अंगावर अत्यंत छान बसते आणि सहजपणे कॅरी करता येते.
एकाच साडीत फिकट आणि गडद अशा दोन रंगांचे शेडिंग असलेल्या ओम्ब्रे साड्या तरुणींना खूप आवडतात. जॉर्जेट किंवा सॅटिन फॅब्रिकमध्ये ओब्रे साडी असते.
साडीच्या काठावर किंवा पदरावर नाजूक चुण्यांची डिझाईन असलेली रफल साडी सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. या साडीमुळे इंडो-वेस्टर्न लूक दिसतो
ज्या तरुणींना साडी नेसणे कठीण वाटते त्यांच्यासाठी प्री-ड्रेप्ड साडी बेस्ट आहे.
नाईट पार्टी, रिसेप्शनसाठी ग्लॅमरस लूक हवा असल्यास सिक्वेन साडीची तुम्ही निवड करू शकता.