Fact check Saam tv
व्हायरल न्यूज

Fact check : 2030 सालापर्यंत माणूस अमर होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Sandeep Chavan

मुंबई : माणूस आता अमर होणार. 2030 सालापर्यंत माणूस अमर होणार असा दावा केल्यानं सगळ्यांमध्येच आनंदाचं वातावरण आहे. कारण, माणूस अमर झाल्यास त्याला कधीही मरण येणार नाही, असा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्याआधी या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज दावा करण्यात आला आहे की, नॅनोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, नॅनोरोबॉट्सच्या मदतीने मानव 2030 पर्यंत अमर होईल. नॅनोबॉट्स शरीरात धावतील. नॅनोबॉट्स लहान रोबोट्स आहेत. 50-100 एनएम आकाराचे असतात. हे नॅनोरोबोट वय वाढवण्यात आणि आजारपण दूर करण्यास मदत करू शकतं. यामुळे माणूस अमर राहू शकतो'.

हा दावा केल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली...त्यावेळी हा दावा अमेरिकन शास्त्रज्ञ रे कुर्झवेल यांनी केल्याचं स्पष्ट झालं...कुर्झवेल हे कॉम्प्यूटर सायंटिस्ट आणि गुगलचे माजी इंजिनियर आहेत...त्यांना नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी हा अवॉर्डही मिळालाय...आणि त्यांनी केलेले अनेक दावे सत्य ठरलेय...त्यामुळे त्यांनी मानवाबाबत केलेला दावे पाहुयात.

रे कुर्झवेल यांनी आतापर्यंत केलेले दावे

रे कुर्झवेल यांच्या 147 दाव्यांपैकी 85 टक्क्यांहून अधिक अंदाख खरे ठरल्याचा दावा

2000 पर्यंत जगातील सर्वोत्तम बुद्धीबळपटू संगणकाद्वारे पराभूत होईल.

त्यावेळी डीप ब्लूने गॅरी कास्परोव्हचा पराभव केला

2023 सालापर्यंत 1000 डॉलरच्या लॅपटॉपची साठवण क्षमता मानवी मेंदूइतकीच असेल

2010 पर्यंत जगातील बहुतांश भागात उच्च-बँडविड्थ वायरलेस नेटवर्क्स अस्तित्वात असतील

2029 पर्यंत जेव्हा AI एक वैध चाचणी उत्तीर्ण करेल आणि मानवांइतकी बुद्धिमत्ता प्राप्त करेल.

यातील बरेच अंदाज खरे ठरलेय...त्यामुळे आम्ही माणूस अमर होऊ शकतो का...? यावर संशोधन सुरू आहे का...? हे आम्ही पडताळून पाहिलं...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

शास्त्रज्ञ रे कुर्झवेल यांच्या दाव्यावर सध्या रिसर्च सुरू आहे. अजूनही माणूस अमर होऊ शकतो हे सिद्ध झालेलं नाही. आपलं वय वाढत जातं तस-तसं आपल्या पेशी आणि ऊती कमकुवत होऊ लागतात. नॅनोरोबोट्सच्या मदतीने त्यांची दुरुस्ती केली जाऊ शकते. नॅनोरोबोटद्वारे मानवी शरीरात उपचार करण्याबाबत प्रयोग सुरू आहेत.

हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरल्यास मानवासाठी वरदान ठरू शकतं...मात्र, अजून हे सिद्ध झालेलं नाही...यावर सध्या रिसर्च सुरू आहे...मात्र, थेट माणूस अमर होऊ शकतो हे आताच सांगता येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

Earbuds blast in woman ear : एअरबड्सचा झाला कानात स्फोट; महिला झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?VIDEO

Kriti Sanon: क्रिती सेनॉनचा स्वॅगच न्यारा, दिसते खूपच कमाल

Devendra Fadnavis Office : मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक; गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीस म्हणाले... VIDEO

Thackeray Group: कुर्ला मतदारसंघावरून राजकारण तापलं; ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड, शिंदे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT